इंदापुरात उद्या सोनाली कुलकर्णी सह दिग्गज सेलिब्रिटी ! लोकनेता प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराकडून दहीहंडीचं आयोजन
आय मिरर
सध्या सर्वत्र दहीहंडी उत्सवाचा माहोल पहायला मिळत असून पुण्याच्या इंदापूर शहरात देखील लोकनेता प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराकडून भव्य राष्ट्रवादी दहीहंडी चषक 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता इंदापुरातील नवीन तहसील कार्यालयाजवळील मैदानात हा दहीहंडीचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराकडून या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून खास करून या सोहळ्याला सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री सुरेखा कडुची,नमिता पाटील आणि अर्चना जावळेकर यांची उपस्थिती असणार आहे.तर या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध आर जे अक्षय करणार आहे.
प्रदीप दादा गारटकर मित्र परिवाराकडून हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून या भव्य आणि थरारक दहीहंडीचे साक्षीदार होण्यासाठी आणि मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असं आवाहन प्रदीप दादा गारटकर परिवाराकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?