एल.जी. बनसुडे विद्यालय मध्ये शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव
आय मिरर
पळसदेव (ता.इंदापूर) येथे मंगळवार 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी व बारावी मधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून दैनंदिन कार्यातून एक दिवस शिक्षकांना विरंगुळा देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्राचार्य वंदना बनसुडे यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक व आजच्या दिनाचे महत्व कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून सादर केले.
ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिका साकारल्या त्यांनी आजच्या दिवसाचे अनुभव सांगताना शिक्षकांची कार्यपद्धती अवघड असून देखील ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात हे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंथन स्पर्धा परीक्षेचे समन्वय बाळासाहेब काशीद यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी देखील सर्व शिक्षकांच्या कामाचे व अध्ययन पद्धतीचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, प्रविण मदने, प्रकाश दरदरे क्रीडा शिक्षक सागर सर तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बनसुडे व नेहा घनवट तर आभार प्रदर्शन कोमल साळवे या विद्यार्थ्यांनी केले.
What's Your Reaction?