जनतेच्या आर्थिक हिताची संस्था म्हणून इंदापूर अर्बन बँकेकडे पाहण्याची गरज : हर्षवर्धन पाटील

Sep 13, 2025 - 20:13
 0  207
जनतेच्या आर्थिक हिताची संस्था म्हणून इंदापूर अर्बन बँकेकडे पाहण्याची गरज : हर्षवर्धन पाटील

आय मिरर 

सर्वांच्या आर्थिक प्रगतीकरिता इंदापूर अर्बन बँक आहे.काही चुका त्रुटी असतील पण या गोष्टी समजून उमजून घेऊन जनतेच्या आर्थिक हिताची संस्था म्हणून तिच्याकडे पाहण्याची गरज आहे.आता काळ बदलत चालला आहे,पूर्वीची परिस्थिती वेगळी होती.गरजा वाढल्या आहेत,बजेट कोलमडत आहे.आपल्याला आता अर्थशास्त्र बघावे लागेल.आज आपली बँक सलग दोन वर्षे अ वर्गात आहे.कायम अ वर्ग राहील अशी अपेक्षा करतो.आज 10 टक्के लाभांश देण्याचा योग आला,तो भागधारकांचा अधिकार असतो.साडेसहा कोटी आपलं भाग भांडवल आहे त्यावरती आपण 65 लाख रुपये मंजूर केले आहेत.भागधारकांना काहीतरी मदत केली असा त्याचा अर्थ होतो.मी देखील भागधारक आहे मलाही तुमच्याबरोबर तो मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मध्ये केले.

इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडली यावेळी ते बोलत होते.

बँकेचे अध्यक्ष सत्यशील पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी लेखापरीक्षण अहवाल वाचून दाखविला.

यावेळी बँकेचे संचालक संदिप गुळवे,ॲड विकास देवकर, लालासाहेब सपकळ,भागवत पिसे,अविनाश कोतमिरे,मच्छिंद्र शेटे, गोविंद रणवरे, स्वप्निल सावंत,संजय जगताप सुभाष बोंगाणे,डॉक्टर मिलिंद खाडे,संजय रायसोनी,डॉ.आश्‍विनी अभिजीत ठोंबरे,डॉक्टर दिपाली खबाले,ॲड.विजय पांढरे,ॲड.माधव शितोळे,ॲड.गिरीश शहा,प्रशांत भिसे तसेच अविनाश घोलप,विलासराव वाघमोडे,शेखर पाटील,शरद जामदार,सुरेश मेहेर,किशोर पवार,तानाजी नाईक,गोरख आदलिंग ,कैलास कदम,विक्रम कोरटकर, दादासाहेब घोगरे यांच्यासह कर्मयोगी निराभिमा कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक,बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले तर आभार बँकेचे उपाध्यक्ष मनोज मोरे यांनी मानले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,बँकिंग क्षेत्रात खूप आव्हान आहेत.भारताची आर्थिक परिस्थिती बघितली आणि जगाची आर्थिक परिस्थिती पहिली तर जग आणि देश आर्थिक संकटातून चालले आहे.बांगलादेश मध्ये काय घडलं हे आपण पाहिलं.तिथं अराजकता माजली. आर्थिक स्थिती बिघडली गेली,लोकांनी पंतप्रधान कार्यालय संसद फोडली.नेपाळ मध्ये काय घडलं ते पाहिले.आपले आणि नेपाळचे चलन एकच आहे.नेपाळ ची अवस्था काय झाली,सोशल मीडिया हे निमित्त आहे पण नेपाळ ची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. पाकिस्तान श्रीलंका अमेरिका मध्ये काय वेगळी स्थिती नाही.जपान मध्ये देखील आर्थिक स्थिती संकटात येऊ लागली आहे.पंतप्रधान यांनी 28 टक्क्यावरचा जीएसटी 18 टक्क्यांवर का आणला,केंद्रापुढे देखील आर्थिक संकट आहे.

मी बऱ्याच वेळा भाषण करायचो अनेकांना ते आवडत नव्हतं,मी जमिनी विकू नका सांगायचो आता पालखी मार्ग गेला आहे लोकांचा आज फायदा झाला आहे.70 टक्के लोकांनी आमच ऐकलं त्याचा त्यांना फायदा झाला.

आलेल्या लक्ष्मीचा आपण कसा करतो याला अर्थ साक्षरता म्हणतात ती आता समजण्याची वेळ आली आहे.जुनी लोक म्हणायचे पांघरूण बघून पाय पसरा.बारीक बारीक गोष्टीतून आपली प्रगती घडत असते.सध्या स्पर्धेचे युग आहे.जिथे बँकेची शाखा काढायची आहे तिथे जाऊन अगोदर 5 कोटी ठेव जमा करा मग शाखा काढाव्यात.

आयबीआय चे काही नियम आहेत.ते नियम बँकेने कटाक्षाने पाळावेत.आता सर्व ऑनलाईन आहे त्यामुळे अधिक काळजी घ्या,बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या त्या वेळी प्रशिक्षण द्यावं.बँकेतीत ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेने त्या सुरक्षित केल्या आहेत.कोणालाही अडचण येणार नाही.सर्वांना विमा संरक्षण घेतले आहे. चोवीस तास अगोदर सांगितले तर तुमचे पैसे तुम्हाला व्याजासहित परत मिळतील अशी खात्री मी देतो.

सभासदाच्या वारसांना काही दुर्दैवी घटना घडली तर 2 लाख रुपयांचा विमा देण्याचे काम आपण केले आहे.वसुलीवर बँकेने भर देण्याची गरज आहे. यामुळे बँकेची सर्व बाजूने पत वाढेल कायम आरबीआय कडून बँकेला अ वर्ग राहील.बँकेच्या अधिकारी वर्गाचे अभिनंदन करावे लागेल.बऱ्याच वेळा कटूपणा घ्यावा लागतो तो ते घेतात.आता स्पर्धेचे युग आहे,इतर बँकांप्रमाणे आपल्याला ही सेवा द्यावी लागेल.एटीएम सारखी सुविधा ही काळाची गरज आहे. आता क्यू आर कोड देखील वापरावे लागतील यात बँकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.बँकेची एक वेबसाईट तयार करू,त्यातून बँकेची सर्व कार्यप्रणाली सभासदांपर्यंत पोहोचवावी लागेल. आता AI चा वापर वाढत आहे या गोष्टी आपण शिकल्या तर स्पर्धेच्या काळात आपण टिकणार आहोत.

या बँकेला कर्मयोगी भाऊंचे आणि घोलप बापूंचे आशीर्वाद लाभले आहेत.बँकेने व्यापाऱ्यांची खाती जास्त वाढवून उद्योग व्यवसाय वाढवा. लोणी देवकर ला एमआयडीसी आणली तेव्हा माझ्यावर खूप टीका झाली परंतु आज परिस्थिती पहिली तर त्या ठिकाणी दोन एकर देखील जागा शिल्लक नाही.तरुण पोरांनी आता व्यावसायिक व्हा बँक तुमच्या पाठीशी आहे.आता आपल्या तालुक्यात खूप बदल होत चालला आहे,दर महिन्याला काही मुले मुली स्पर्धा परीक्षेत भरती होत आहेत.

आपण निवडून आलो नाही,दिवस सगळे सारखे नसतात.काही कारण असतात.तुम्ही 19 वर्षाचा माझा संघर्ष पाहिला.तुम्ही मला साथ दिली.स्वर्गीय भाऊंनी घालून दिलेला मार्ग आपण घेऊन पुढेही चालू.माझं एक स्वप्न आहे पुढील वर्षी जेव्हा आपण वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ तेव्हा 250 कोटी आपली ठेव असावी आणि नफा 10 कोटी असावा अशा अपेक्षा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow