भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात, शिंदेच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sep 12, 2025 - 07:16
Sep 12, 2025 - 07:16
 0  10506
भिगवणमध्ये रील स्टार प्रतीक शिंदेच्या नव्या फॉर्च्युर्नरमुळे अपघात, शिंदेच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आय मिरर(निलेश मोरे)

नुकताच मोठा गाजावाजा करून घेतलेली फॉर्च्युर्नर गाडी आता इंदापूरचा प्रसिद्ध रील स्टार प्रतीक शिंदेसाठी अडचणीची ठरली आहे. गुरुवारी सायंकाळी प्रतीक शिंदे याच्या या गाडीला अपघात झाला आहे. पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना इंदापूर तालुक्यातील भिगवण नजीक मदनवाडी येथे प्रतीक शिंदेच्या गाडीने पुढे निघालेल्या क्रेटा कार ला पाठीमागून धडक दिली.

धडक एवढी जोरात होती की क्रेटा पुढे असलेल्या मारुती वॅगनर वर जाऊन आढळली. ज्यामुळे एका अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे असून रील स्टार प्रतीक शिंदे वय 24 वर्षे राहणार भादलवाडी तालुका इंदापूर याच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला अपघाताचा थरार....

फिर्यादी निखील बाळासाहेब होले वय 35 वर्षे रा. अकलूज, सोलापूर हे आपल्या हुंदाई क्रेटा कार क्रमांक एम.एच. 45 ए.यु. 9779 या गाडीतून प्रवास करत होते. गुरुवारी सायं.पाचच्या सुमारास मदनवाडी, सकुंडे वस्ती जवळील ऑस्करवाडी मिसळ हॉटेलसमोर, पाठीमागून भरधाव आलेली टोयोटा फॉर्च्युर्नर वाहन क्रमांक एम.एच. 42 बी.एस. 0111 हिने क्रेटा कार जोरात धडक दिली.

ही गाडी दुसरा कोणी चालवत नव्हता तर स्वतः रील स्टार प्रतीक शिंदे हा चालवत होता. प्रतीक शिंदे हा इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावचा आहे. धडकेचा जोर एवढा होता की क्रेटा पुढे असलेल्या मारुती वॅगनर (एम.एच. 12 एक्स एम. 3816) वर आदळली. काही क्षणांत तीनही गाड्या एकमेकांत आपटून मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या.

शिंदे विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल...

या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेवरून भिगवण पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 229/2025 दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीक शिंदेवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोहवा उगले (ब. नं. 2637) करीत आहेत.

स्थानिकांमध्ये चर्चेला जोर...

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच घेतलेली फॉर्च्युर्नर अशा प्रकारे अपघाताला कारणीभूत ठरल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. “लोकप्रियतेच्या नादात फिल्मी स्टाईलने गाडी चालवण्यावर आळा बसलाच पाहिजे,” अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगताना दिसत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow