स्वार्थ बाजूला ठेऊन इतरांना कशी मदत होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Sep 13, 2025 - 21:06
Sep 13, 2025 - 21:34
 0  507
स्वार्थ बाजूला ठेऊन इतरांना कशी मदत होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

आय मिरर 

आयुष्य हे खूप सुंदर आहे,या जगात प्रत्येकाला स्वार्थ आहे पण तो बाजूला ठेऊन आपणाकडून शेजाऱ्या पाजाऱ्यांचं गावाचं तालुक्याचं कसं कल्याण होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं प्रतिपादन राज्याच्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मध्ये केले.

इंदापुरात श्रीगुरु नामदेव अण्णा वसेकर पुण्यतिथी उत्सव समिती इंदापूर यांच्या वतीने, श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फड २२५ वर्षे स्थापनापूर्तीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व माऊली गाथा पारायण सोहळ्याची सांगता शनिवारी 13 सप्टेंबर रोजी हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. मंत्री भरणे यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली या प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री भरणे म्हणाले की, बोराटे महाराजांच्या कृपेने एक चांगला सप्ताह इंदापूर मध्ये होतो याचा आम्हाला आनंद आहे. संप्रदायाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्पर्धेच्या धावत्या युगात प्रत्येकाकडे वेळ कमी आहे. तरी देखील आपण आपल्या गुरुच आचरण करून वेगळ्या प्रकारचे मनशांती लाभली पाहिजे, यासाठी इंदापूर मध्ये माऊली गाथा पारायण सोहळा आणि सप्ताह आयोजित केला आहे. 

आपल्याला सर्व काहीही इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आपल्याकडून इतरांना मदत कशी होईल असा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्या बोलण्यामुळे वागण्यामुळे कोणाचे तरी मन दुखवेल कोणाला तरी वाईट वाटेल कोणाची तरी झोपमोड होईल असं आयुष्यात कधीही करू नका.तुमच्यात आल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना राज्याचा मंत्री असलो तरी सर्व विसरून कुठेतरी शांत बसा वाटतं. आनंद घ्यावा वाटतो.सर्वजण आपल्या तालुक्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करू. 

नेहमीप्रमाणे भरत शेठ शहा यांनी इंदापूर मध्ये हे कार्यालय तर उपलब्ध करून दिलेच आहे.याशिवाय त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सुविधाही दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासह ज्यांनी कोणी मदत केली आहे त्या सर्वांची मी स्वतः आभार मानतो. आज आपल्या तालुक्याचे राज्यामध्ये तालुक्याचा नावलौकिक होत आहे. 

राज्याचा कृषिमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे माझ्याकडे असणारे पद हे जबाबदारीच आहे. माझ्या शेतकरी बांधवांना त्या माध्यमातून काय सहकार्य मदत करता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

या सोहळ्याला कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, शहा ग्लोबल स्कूल संस्थेचे विश्वस्त मुकुंद शहा, इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा, नारायणदास रामदास ट्रस्टच्या वैशालीताई शहा, तसेच शहा ग्लोबल स्कूलचे अंगद शहा व रुचिरा शहा यांसह संपूर्ण शाह परिवार उपस्थित होता. हरिनामाच्या गजरात आणि शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.दरम्यान वै.ह.भ.प.गोकुळदास शहा यांच्या स्मरणार्थ शहा परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow