इंदापुरात सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आणि जिंकणार : भाजप नेते प्रवीण माने यांचा दावा
आय मिरर
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासह नगर परिषदेच्या निवडणुका अगदी काही दिवसात जाहीर होतील त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत पुण्याच्या इंदापूर मध्येही भारतीय जनता पार्टीने या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे.
राज्याचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, राहुल कुल, राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आणि त्या जिंकणार देखील असा दावा इंदापूरचे भाजपचे नेते प्रवीण माने यांनी केला आहे.
स्वबळावर निवडणुका लढण्याचा आदेश देखील आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी करा युतीचा निर्णय होईल तो नंतर होईल मात्र तयारीला लागा अशा सूचना वरिष्ठांनी दिल्याचे माने यांनी म्हटलं आहे.
युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील...
इंदापूर मध्ये निवडणुका लढत असताना सत्तेतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती होणार का ? असं माने यांना विचारलं असता ते म्हणाले की,याबाबत आत्ताच काही बोलणं योग्य नाही. आमच्याकडे कोणत्याही पक्षाचा प्रस्ताव वगैरे आलेला नाही. स्वबळावर लढण्याची आमची तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या काळात मोठे इन्कमिंग होणार त्याचा बॉम्ब लवकरच या ठिकाणी फुटेल, नामवंत व्यक्ती भाजपात येथील असा दावाही प्रवीण माने यांनी केला आहे.
आगामी काळात मोठी इन्कमिंग होणार...
आम्ही कोणालाही गळाला लावत नाही मात्र आमच्या नेतृत्वावर येणाऱ्या लोकांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुक्यात चांगल्या स्वरूपाचे वातावरण होणार आहे. पक्षप्रवेशासाठी आमच्या पक्षात सर्वाधिक जास्त लाईन लागलेली आहे राज्यात ही आहे तीच तालुका स्तरावर ही आहे.
इंदापूर तालुक्यात खूप मोठी सुक्त लाट भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. ती शहरात ही आहे आणि तालुक्यात ही आहे. आम्ही बैठका सुरू केल्या असून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते ताकदवान आहेत. त्यांच्या सहकार्याने येणाऱ्या सर्व निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत. पक्षानं आदेश दिल्यावर स्वबळावर सर्व निवडणुका आम्ही लढवणार आणि त्या जिंकणार देखील.
मयुरी मानेंच्या उमेदवारीचे मानेंकडून संकेत...
निमगाव केतकी जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यानुसार निर्णय घेऊ, सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल असं म्हणत प्रवीण माने यांनी या जिल्हा परिषद गटातून आपल्या पत्नी मयुरी माने यांच्या उमेदवारीचे एक प्रकारे संकेत दिले आहेत.
पाटील माने युतीवर वरिष्ठ निर्णय घेतील...
गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहरात आणि तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत माने परिवार आणि पाटील परिवार एकत्र येईल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यावर देखील प्रवीण माने यांनी भाष्य केलं आहे. म्हणाले की अशा चर्चा सुरू आहेत, परंतु अशा पद्धतीचा कोणताही प्रस्ताव आमच्याबरोबर किंवा चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही. तो निर्णय आमचा नसेल भारतीय जनता पार्टीच्या वरच्या वरिष्ठ नेत्यांचा असेल. जर तसा प्रस्ताव आला तर तो आम्ही आमच्या नेत्यांकडे पाठवू नेते सांगतील तू आमचा अंतिम निर्णय असेल. यावरती पार्टीची वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील असेही मान्य म्हणाले.
इंदापूर नगर परिषदेची सत्ता भाजपला द्या पाच वर्षात कायापालट करू....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासात्मक महाराष्ट्र पुढे जात असून यापूर्वी अनेक नेत्यांनी इंदापूरचे सिंगापूर करू अशा घोषणा केल्या पण इंदापूरकरांनी भारतीय जनता पार्टीकडे जर इंदापूर नगरपरिषदेची सत्ता दिली तर निश्चित पाच वर्षात इंदापूर शहराचा कायापालट करू असा दावा इंदापूरचे भाजपचे नेते प्रवीण माने यांनी केला आहे. सिंगापूर पेक्षा सुंदर शहर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केलं जाईल असं माने यांनी म्हटल आहे.
इंदापूर हा ऐतिहासिक इंदापूर तालुका आहे. मात्र नागरिकांना अनेक समस्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक कोटी रुपयांचा नमो उद्यान दिले आज कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांना इंदापूर शहरात बसण्यासाठी किंवा मनमोकळे मनाने फिरण्यासाठी एकही सुविधा नाही बगीचा नाही. ते आता देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहे. क्रीडा संकुल आहे त्यात सुविधा नाहीत. कोण कमी पडतोय असं मला म्हणायचं नाही पण जर भाजपकडे इंदापूर शहरात नागरिकांनी सत्ता दिली तर कायापालट होईल मागील 35 वर्षाचा बॅकलॉग भरून काढू असा दावा माने यांनी केला.
What's Your Reaction?