Inside story एकाच मंचावर तीन पक्षाचे तीन नेते अन् कोपरखळ्या ! शिवेंद्रसिंहराजे म्हणाले फक्त मला चेपटवू नका

Aug 29, 2025 - 18:50
Aug 29, 2025 - 18:53
 0  332
Inside story एकाच मंचावर तीन पक्षाचे तीन नेते अन् कोपरखळ्या ! शिवेंद्रसिंहराजे म्हणाले फक्त मला चेपटवू नका

आय मिरर 

शरद पवार गटाचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. दत्तात्रय भरणे यांकडून हर्षवर्धन पाटील यांचा सलग तीन वेळा पराभव झालाय.आता राज्याच्या मंत्रिमंडळात दत्तात्रय भरणे यांचे प्रमोशन झालंय.कृषिमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे हे प्रथमच इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या.

 

याच वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र या दोघांची गंमत करीत तुम्ही माझ्यामुळे एकत्र आला आहात मला सारखं सारखं इकडं बोलवत जावा म्हणजे तुम्ही दोघे सारखे एकत्र याल मी दोघांच्या मध्ये बसेल मला काहीच अडचण नाही फक्त मी चेपटणार नाही याची काळजी घ्या असं म्हणताच एकच हसा पिकवला.

हर्षवर्धन पाटील नेमकं काय म्हणाले...

इंदापूरचे लोकप्रतिनिधी राज्याचे कृषिमंत्री झाले याचा आम्हाला आनंद आहे. कृषिमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच आपली भेट झाली. त्यामुळे आपलंही अभिनंदन. बरं झालं आता ते स्वतः शेती करतात, त्यांना शेतीचा सर्व अनुभव आहे. त्यामुळे आमची कृषीमंत्र्यांना विनंती आहे, दुधाचे दर पडले आहेत वाढवा.

 

उसाचे दर पडले आहेत वाढवा, इतर बाकीच्या शेतमालाच्या किमती कमी झाल्या आहेत वाढवा, महाराष्ट्रात दर तीन तासाला शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे तो कसा थांबेल हे पहा म्हणत असा विविध मागण्यांचा सपाटा लावला.

पाटील पुढे म्हणाले,यासाठी आपण सगळ्यांनी मिळून ती काही एकट्या मंत्र्याची जबाबदारी नाही. आमचाही प्रशासनातील काही अनुभव आहे तोही अनुभव आम्ही तुमच्याशी मार्गदर्शन करू आपलं राज्य आपला तालुका शेतीप्रधान आहे.शेतकऱ्यावरती आपलं भवितव्य अवलंबून आहे आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत राजकारणात समाजकारणात अशा संधी ज्यावेळी मिळतात त्यावेळी एक ठसा उमटवण्याचं काम आपलं लोकप्रतिनिधी करतील अशी मला खात्री आहे असा विश्वास ही पाटील यांनी व्यक्त केला.

सुदैवाने मुख्यमंत्र्यांना या सर्व गोष्टींची जाणीव आहे, तुमच्या मदतीला दोन उपमुख्यमंत्री आहेत. तन्हाई अनुभव आहे आणि एकूणच अनुभवी सरकार असल्याने प्रश्न सुटेल. मेजॉरिटीचा तर आता विषयच नाही 245 असल्यामुळे तुम्ही दोन्हीही मंत्र्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ संपेपर्यंत सगळ्या आमदारांची आणि तुमची भेट होईल की नाही अशीही शंका आहे असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

पाटलांच्या कोपरखळीला मंत्री भरणेंचं उत्तर...

कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना हर्षवर्धन भाऊ आणि माझी भेट झाली. त्यांना शासनाचा अनुभव आहे, अनुभवाच्या नात्याने त्यांनी मला काही सल्ले दिले आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी राज्याचा कृषिमंत्री झालो. माणसाने आयुष्यात कधी न्यूनगंड बाळगायचा नसतो. मलाही होईल का मला हे जमल का हे झेपेल का ? काही नसतं. प्रत्येक क्षेत्रात जर कष्ट घेतलं मेहनत जिद्द चिकाटी बाळगली तर मिळत असतं.

मला माहित पण नव्हतं की कधीकाळी मी कारखान्याचा चेअरमन होईल बँकेचा संचालक पुढे चेअरमन होईल, झेडपीचा अध्यक्ष होईल आमदार होईल राज्यमंत्री, क्रीडा मंत्री, कृषिमंत्री होईल. पदही मिळत असतात त्या पदाचा उपयोग आपल्या लोकांसाठी किती होतो हे महत्त्वाचं.पद मोठे आहे,जबाबदारीची जाणीव आहे,अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला मदत कशी होईल याची जाणीव आम्हाला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं लक्ष आमच्यावर असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow