आझाद मैदानातील मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी बारामती इंदापूरकर सरसावले...
आय मिरर
मुंबईतील आझाद मैदानावर 29 ऑगस्ट पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठे हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी आंदोलनाला बसले आहेत. संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला असल्याने मुंबई जाम झाली आहे.अशातच आंदोलकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येताच आंदोलकांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्यासाठी लाखो हात समाजातून आता पुढे सरसावले आहेत.
यात बारामती इंदापूरकर देखील कमी नाहीत.मुंबईत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा बांधव राज्यभरातून गेले आहेत. पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांच्या जेवणाची सोय व्हावी यासाठी बारामती करांसह इंदापूरकर पुढे सरसावले आहेत. दहा हजार आंदोलकांना पुरेल एवढं जेवण बारामतीतून पाठवण्यात आले आहे.बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईला शिदोरी पाठवण्यात आली आहे.
मोठ्या संख्येने बारामतीकरांनी मुंबईकडे शिदोरी पाठवण्याचा निर्धार केला आहे.याच्यामध्ये भाकरी, चटणी, ठेचा तसेच पाण्याच्या बाटल्या देखील देणार असल्याचं बारामतीकरांनी सांगितलं. बारामतीत जिजाऊ भवन येथे हे सगळं अन्न एकत्र गोळा करण्यात आले. तसेच जोपर्यंत आंदोलन सुरू असणार आहे तोपर्यंत ही शिदोरी जाणार असल्याचे देखील त्यांचं म्हणणं आहे.
इंदापूरच्या अनेक गावातून अन्नधान्याची मदत...
बारामतीकरण प्रमाणेच इंदापूर तालुक्यातील सराटी गावासह अन्य गावातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्य मुंबईला पाठवण्यात आलं आहे. एकट्या सराटी गावातून 4500 चपाती 1000 भाकरी यासोबत बुंदी,मिरचीचा ठेचा,लोणचं, फळे यास इतर अन्य पदार्थ हे मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने पोहोच करण्यात आले आहेत. याशिवाय इंदापूर तालुक्यातील विविध गावातून अशा पद्धतीने अन्यधान्याचा पुरवठा केला जात आहे.
मुंबईमधील आझाद मैदानातील आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून गेल्या दोन दिवसापासून आंदोलन मैदानात बसून आहेत. सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असल्याने आंदोलकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय दुसरीकडे अन्नधान्याची उपलब्धता नसल्याने मराठा आंदोलकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर या आंदोलकांना बळ देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता मराठा समाजा बांधवांकडून अन्नधान्याचा पुरवठा केला जातोय आणि त्यासाठी अनेक जिल्ह्यातून गावांतून अन्नधान्याची मदत या आंदोलकांसाठी आता होऊ लागली आहे.
What's Your Reaction?