जिद्द व चिकाटीच्या जोरावर इंदापूरच्या हर्षदाने करुन दाखवलं ; वैद्यकीय नीट परिक्षेत मिळवले 720 पैकी 660 गुण

Jun 18, 2024 - 07:09
Jun 18, 2024 - 07:12
 0  3890
जिद्द व चिकाटीच्या जोरावर इंदापूरच्या हर्षदाने करुन दाखवलं ; वैद्यकीय नीट परिक्षेत मिळवले 720 पैकी 660 गुण

आय मिरर

कोणतीही शिकवणी न लावता केवळ ऑनलाइन अभ्यासक्रमाचा लाभ घेऊन घरी अभ्यास करत अत्यंत अवघड अशा नीट परीक्षेत कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर कु. हर्षदा अरुण राऊत हिने नीट युजी ( NEET - UG) या वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या परीक्षेत 720 पैकी 660 गुण प्राप्त करून दैदीप्यमान यश मिळवले आहे.

इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सहशिक्षक अरुण लक्ष्मण राऊत यांची कु. हर्षदा ही कन्या आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हर्षदा हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्री ना. रा. इंग्लिश मीडियम स्कूल इंदापुर येथे झाले आहे व नंतरचे बारावी पर्यंतचे शिक्षण श्री ना. रा. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर मध्ये झाले आहे. तिला दहावी मध्ये 94.60 टक्के गुण व बारावी मध्ये 91.87% गुण मिळाले होते व दोन्ही वेळेस तिने प्रथम क्रमांक मिळाला होता. 

गेल्या वर्षी तिला नीट परीक्षेमध्ये 560 गुण मिळाले होते परंतु तिचा शासकीय कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी नंबर न लागल्यामुळे खचून न जाता तिने जोमाने घरीच अभ्यास केला व हे यश संपादन केले आहे. 

हर्षदा हिने संपादन केलेल्या उज्वल यशाबद्दल माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव मनोहर चौधरी व संस्थेचे सर्व संचालक यांनी तिचे अभिनंदन केले व तिला पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow