बिग ब्रेकिंग | इंदापूरच्या चिखलीत नारळाच्या झाडावर कोसळली वीज
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील कुरवली चिखली भागात आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस झालाय, यामध्ये इंदापूर दूध संघाचे संचालक अभिजीत माने यांच्या चिखली येथील शेतात नारळाच्या झाडावरती वीज कोसळली. यामध्ये नारळाचं झाड जळून खाक झालं आहे.
आज दिवसभर हवेमध्ये प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. अशातच सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला ही सुरुवात झाली. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने काही अंशी या परिसरात उघड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
पावसाचं प्रमाण कमी असलं तरी हवेमध्ये वाऱ्याचा वेग ज्यादा होता अशातच आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान पाचच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील चिखली येथील माने यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली आणि एका क्षणात हिरव्यागार झाडाने पेट घेतला. यात नारळाचे झाड जळून खाक झाला असून माने यांचं नुकसान झालं आहे.
गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं मोठी ओढ दिलेले आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यात देखील याचा परिणाम जाणवत आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून पावसाअभावी शेतातील पिके करपू लागली आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची मोठी अपेक्षा असून वरून राजा उपस्थिती लावून शेतकऱ्यांना या दुष्काळ जन्य परिस्थितीतून बाहेर काढावं अशी अपेक्षा बळीराजा उराशी बाळगून आहे. त्यामुळे कधी एकदा मोठा पाऊस कोसळतो आणि पुन्हा एकदा शेत शवार हिरवगार होतं याच्याच चिंचेत शेतकरी वर्ग आहे.
What's Your Reaction?