एक सप्टेंबरच्या मोर्चा प्रकरणी हाकेंसह सात जणांविरोधात यवत पोलिसात गुन्हा

Sep 29, 2026 - 10:16
Sep 29, 2026 - 10:20
 0  47
एक सप्टेंबरच्या मोर्चा प्रकरणी हाकेंसह सात जणांविरोधात यवत पोलिसात गुन्हा

आय मिरर 

दौंड तालुक्यातील पाटस येथून 1 सप्टेंबर रोजी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी महा एल्गार मोर्चा काढल्या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

याप्रकरणी लक्ष्मण हाके यांना आयोगात पोलिसांनी 27 सप्टेंबर रोजी नोटीस दिली असून 29 सप्टेंबर म्हणजे आज रोजी यवत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

मात्र लक्ष्मण हाके यवत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आज हजर राहणार नसल्याची माहिती आहे.

एक सप्टेंबर रोजी ओबीसी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात दौंड तालुक्यातील पाटस येथून मुंबई मुंबईकडे जाण्यासाठी ओबीसी महाएल्गार मोर्चा काढण्यात आला होता.या महा एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.तरीसुद्धा हा मोर्चा काढण्यात आला होता.

परवानगी नसताना काढलेल्या मोर्चा मुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सह बापूराव सोनवलकर, किशोर हिंगणे, नानासाहेब मदने,अतुल टेळे,रामचंद्र भागवत, शंकर पवार यांच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow