एल निनो चा प्रभाव, शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे ! माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं पावसासाठी नंदिकेश्वरचरणी साकडं 

Aug 24, 2026 - 20:54
Aug 24, 2026 - 20:56
 0  95
एल निनो चा प्रभाव, शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे ! माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं पावसासाठी नंदिकेश्वरचरणी साकडं 

आय मिरर 

राज्याच्या विविध भागात एल निनो चा प्रभाव प्रकर्षणात पाहायला मिळतोय, काही ठिकाणी पाऊस झालाय तर काही ठिकाणी पावसाने पूर्ण दडी मारली आहे. राज्यातील धरणांमध्ये फक्त 74 टक्केच पाणीसाठा आहे. सप्टेंबर कोरडा गेला आहे तर शेती पिकं संकटात आल्यात काही ठिकाणी शेती पिकांनी माना देखील टाकल्यात. आता शेतकऱ्याचे डोळे लागले आहेत ते केवळ पावसाकडे.

केवळ इंदापूरच नव्हे तर राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने प्रदीर्घ काळ दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम व वर्ष सुजलाम सुफलाम जाणेसाठी आगामी काळात धो धो पाऊस पडू दे, असे श्री नंदिकेश्वर चरणी साकडे घातल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 24) दिली.

इंदापूर तालुक्यातील निरवांगी नजीक दगडवाडी येथील नीरा नदीच्या काठी वसलेल्या प्राचीनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरामध्ये हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांनी सोमवारी (दि.24) विधिवत पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी आगमन प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये स्वागत केले. त्यानंतर मंदिरामध्ये हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक, आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे पौरहित्य विठ्ठल गुरव यांनी केले.

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात नंदिकेश्वर देवस्थान बरोबरच इतर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मंदिर परिसरांचा विकास होऊ शकला. नंदिकेश्वर मंदिराचे शिखराचे काम झाले असून आता मंदिराचे प्राचीनकालीन दगड फिनिशिंग व जीर्णोद्धाराचे उर्वरित काम पूर्ण केले जाईल.

ते पुढे म्हणाले, सध्या पुरेशा पावसाअभावी असून खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. सध्या निरा व भिमा नद्या पाण्याने वाहत असल्या तरीही जर आपलेकडे पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र नदीपात्रातील पाणी हे जास्त दिवस टिकणार नाही.

नंदिकेश्वर देवस्थान हे इंदापूर तालुक्यात वैभव असून जागृत देवस्थान आहे. त्यामुळे नंदिकेश्वराच्या आशीर्वादाने आगामी काळात समाधानकारक पाऊस पडेल, असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. 

इंदापूर तालुका शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून, तालुक्यातील युवक हे शिक्षणाच्या व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची शिखरे पदांक्रांत करीत असल्याचे गौरवोदगारही त्यांनी काढले.

याप्रसंगी दत्तात्रय पोळ, मनोज निंबाळकर, वीरसिंह रणसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, जयकुमार कारंडे, मनोज पाटील, दत्तू सवासे, अमरदीप काळकुटे, दत्तात्रय पोळ, राजकुमार जाधव, राजेंद्र देवकर, महावीर गांधी, हरिभाऊ बागल, अनिल बोन्द्रे, रामचंद्र नाईक, धनंजय कोरटकर, रामदास रासकर, दयानंद गायकवाड, गोविंद रणवरे ,गुलाबराव पोळ, भागवत गोरे, भाऊसाहेब काळकुटे, राजेंद्र कोरटकर, संदीप धनवडे, निवृत्ती शिंदे, राजाराम सूळ, युवराज रणमोडे, शंकर शेंडे, मारुती रासकर, अजिनाथ कांबळे, महादेव कवितके, दादा काळे तसेच चित्ररेखा कोरटकर, संगीता पोळ, कल्पना शिंदे, निरवांगी सरपंच सुरेखा गुरव, दगडवाडी सरपंच सुशीला रासकर आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू रोकडे यांनी केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे हस्ते मंदिर परिसरामध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.

निरा भीमा कारखान्याकडे बंधारे अडविण्याची जबाबदारी- हर्षवर्धन पाटील

निरा भिमा कारखाना कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे व भिमेवरील भाटनिमगाव, टणु, शेवरे हे बंधारे अडविण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये किमान मे पर्यंत तरी पाणीसाठा उपलब्ध राहून शेतकऱ्यांचा फायदा होईल, हा शेतकऱ्यांसाठीचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow