बारामतीत धक्कादायक ! शेरेवाडी मध्ये दोन वयोवृद्ध महिलांचा खून

Sep 29, 2026 - 08:37
Sep 29, 2026 - 08:40
 0  385
बारामतीत धक्कादायक ! शेरेवाडी मध्ये दोन वयोवृद्ध महिलांचा खून

आय मिरर 

बारामती तालुक्याच्या सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेरेवाडी मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन वयोवृद्ध महिलांचा गळा चिरून खून करण्यात आलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू करण्यात आला आहे.

65 ते 70 वर्ष वयाच्या या दोन्ही महिला असून कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला शेजारी शेजारी राहणाऱ्या असून त्या घराबाहेर रात्री एकत्रच झोपल्या होत्या, याच वेळी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती सुपे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत शेळके यांनी दिली आहे. सुपे पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय.

दरम्यान या घटनेनंतर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्यासह सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली आहेत.

पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या बाजूने या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके देखील आता तैनात करण्यात आली आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow