बारामतीच्या माळेगावात तीन युवकांवर टोळक्याचा हल्ला ; कोयत्याने वार
आय मिरर
बारामती तालुक्यातील माळेगाव मध्ये तिघांवर टोळक्याकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. काल सोमवारी रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
माळेगाव येथील राजहंस चौकात गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी रात्री 8 वाजून 20 सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात संदीप दत्तात्रय जगताप, अनिकेत उदयसिंह धुमाळ आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर हे तिघे जण जखमी झाले आहेत.
माळेगाव पोलीस ठाण्यात संदीप जगताप यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून जुन्या भांडणाच्या कारणातून हा हल्ला झाल्याची माहिती माळेगाव पोलिसांनी दिली आहे.
गजबजलेल्या राजहंस चौकात कोयत्याने हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींवर पोलिसांचा वचक राहिला आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून हल्लेखोरांवर काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?