Dound विजेच्या धक्क्याने दोन सख्या भावांचा मृत्यू ; सुदैवाने आई वाचली

Aug 19, 2026 - 12:40
 0  1218
Dound विजेच्या धक्क्याने दोन सख्या भावांचा मृत्यू  ; सुदैवाने आई वाचली

आय मिरर 

दौंड तालुक्यातील राहू परिसरात विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील राहू परिसरातील सोनवणे मळा येथे आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

रोहित अनिल भोईटे वय 20 वर्षे आणि ओम नितीन भोईटे, वय 18 वर्षे अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर सोनाली नितीन भोईटे, वय 40 वर्षे, या घटनेत जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीजप्रवाह उतरल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शेजारी राहणाऱ्या शिवराज नवले यांनी प्रसंगावधान राखत वीजपुरवठा बंद केला आणि तिघांनाही रुग्णालयात दाखल केले.

मात्र रोहित आणि ओम यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून विजेचा धक्का नेमका कोणत्या कारणाने लागला याचा तपास यवत पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow