तेराव्या ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये प्रियदर्शिनीच्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
आय मिरर
आयडियल स्पोर्ट अँड मार्शल आर्ट अकॅडमी, नातेपुते यांच्या वतीने आयोजित केलेल्या तेराव्या ओपन कराटे चॅम्पियनशिप मध्ये पुण्याच्या इंदापूर शहरातील प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विविध पदकांवर आपलं नाव कोरले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये चैतन्य आंकुशे याने १६ ते २० किलो वजन गटात प्रथम क्रमांक,पुष्कर गायकवाड याने २६ ते ३० किलो वजन गटात प्रथम क्रमांक,शिवांश फलफले याने २१ ते २५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक,परिशिष्टा धायगुडे हिने २६ ते ३० किलो वजन गटात प्रथम क्रमांक आणि वरद दिवशे याने ५१ ते ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक संपादित करत सुवर्णपदक कमावले.
यासोबत शिवतेज आनभुले याने १६ ते २० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,आरव शिंदे याने २१ ते २५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,समीक्षा दिवशे हिने ४५ ते ५० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,अथर्व दिवशे याने २६ ते ३० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,ईश्वरी दिवशे हिने ५१ ते ५५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक आणि विवान पेटकर याने २१ ते २५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवत रोप्य पदकाची कामगिरी केली.
तर अबूतला पिरजादे हिने २१ ते २५ किलो वजन गटात आणि शौर्य व्यवहारे याने १६ ते २० किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले.
क्रीडा प्रशिक्षक सचिन केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.दरम्यान उल्लेखनीय कामगिरी बरोबरच क्रीडा प्रशिक्षक सचिन केंगार यांना २०२६ चा क्रीडा रत्न पुरस्कार देऊन गौरव ही करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी. जी. नायर ,उपाध्यक्ष इम्रान शेख आणि प्राचार्य भिसे एस. एम , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, क्रीडा प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?