अजित पवार खीर वरपण्याचं काम करताहेत - लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Jul 17, 2025 - 21:33
Jul 17, 2025 - 21:39
 0  208
अजित पवार खीर वरपण्याचं काम करताहेत - लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

आय मिरर 

प्रवीण गायकवाड नेहमी मनुवादी भाजपावर टीका करतात,अजित पवार त्याच मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधील खीर वरपण्याचं काम करत आहेत ना? अजित पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपत आहेत.तुम्ही कधी बहुजनांची लढाई लढलात का ? या पवारांनी,या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी एकूण बजेट मधील एक टक्का तरतूद ओबीसी ला केली नाही.

प्रवीण गायकवाड यांनी नेहमी इतिहास उकरून काढला ब्राम्हणांवर टीका केली.कधी माळी तर कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं.महाराष्ट्रात दोन नंबर ला संख्या असणाऱ्या धनगर समाजाचं एकही कारखाना होऊ शकला नाही.प्रवीण गायकवाड अभी तो बात सुरू हुई है दूर तक जाएगी असा इशाराच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. लक्ष्मण हाके यांनी काही कार्यकर्त्यांच्या भेटी देखील घेतले आहेत. त्यानंतर हाके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

सामाजिक न्याय विभाग कामकाज बाबत भाजपा नेत्यांची नाराजी आहे याला जबाबदार अजित पवार आहेत, ते जातीयवादी आहेत.आदिवासी विभागाचा शेकडो कोटींचा निधी, समाजकल्याण चा शेकडो कोटी निधी, ओबीसी च्या महाज्योतीची 150 कोटीचा बॅकलॉक सारथी च्या विद्यार्थ्यांना 8 लाख जमा करणारे हे अजित पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एक रुपया द्यायला तयार नाहीत.

सोशल जस्टिस म्हणजे काय? अजित पवारांना काय कळत का ? महाराष्ट्रातील लोकांनी कारखानदारांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत.अजित पवारांकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही,फडणवीसांवर आच विश्वास,येऊ घातलेल्या काळात मुख्यमंत्री बोलले नाहीत तर संघर्ष पुढचा काळ ओबीसींचा असेल.अस ही हाके म्हणाले.

म्हणून उत्पादन शुल्क खातं हवं होतं...

नेहमी गुळाला मुंग्या चिकटतात तसं उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थ खात्याला चिटकून बसले आहेत.सरकार कोणतेही असो अर्थ खातं हे अजित पवारांकडेच असतं.अर्थ खात कशासाठी हवं असतं असा सवाल उपस्थित करत उत्पादन शुल्क खात ही अजित पवारांना यासाठीच हवं आहे की जय पवार यांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन एक लाख दहा हजार लिटरचा आहे तो कारखाना चालवायचा आहे.कायद्यामध्ये खाडाखोड करायचे आहे त्यासाठी त्यांना या गोष्टी लागतात असा घनाघात ओबीसींचे नेते हाके यांनी केला आहे.

हाके म्हणाले की आज बारामतीत आलो आहे.माहिती अधिकारी कार्यकर्ते पोपट धावडे यांच्या कार्यालयाला याशिवाय माळेगांव नीरा वागज या आजुबाजूच्या गावात ही भेटी दिल्या.आगामी काळात राज्यातील ओबीसी जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांचा खूप मोठा लढा उभा राहतोय.अधिवेशन संपताच त्याच्या बैठका राज्यात आम्ही सुरू करीत आहोत.त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आलो आहे.

प्रवीण गायकवाड यांवर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो.आम्ही लोकशाही मानणारी मानस आहोत. जे पेरलं तेच उगवलं मी असं का म्हणालो तर संभाजी ब्रिगेडने गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात हेच केलं आहे ना ? त्यांनी गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळ करण्याचं काम केलं आहे.

अनेक ग्रंथालय फोडली,पुतळे उकडून फेकले.बहुजन समाजातील काही नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलं.आज गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बहुजनवर हल्ला झाला,पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला असे मुद्दे पुढे येतात पण विधानसभेच्या अगोदर लक्षण हाके यांच्यावर हल्ला का झाला होता ? कोणत्या ब्रिगेडर ने केला होता ? त्यावेळी प्रवीण गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत.

नाव बहुजनांच घ्यायचं काम मात्र पवार कुटुंबाच...

प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांच घ्यायचं काम मात्र पवार कुटुंब, कोल्हापूर चे महाराज वतनदार झागीरदारंच करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरात लपून बसायचं. असं हाके यांनी म्हटलं.

एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पाईक आहे दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामांनी पक्ष दिला,निवडणुका लढल्या त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही करायचा.कसले तुम्ही पुरोगामी ? काय आहे तुमचा बहुजनवाद असा सवाल ही हाके यांनी गायकवाड यांना केला.

बहुजनवादात मराठा सोडून इतर कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिले आहे.मी प्रवीण गायकवाड यांना साहित्यातला खूप मोठा पुरस्कार द्यावा म्हणून शिफारस करतो.चॅरिटेबल काम करून परिवर्तन होत नसत त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते.वतनदारांचे जीवन जगून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत.बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो.

एक ग्रामपंचायत नव्हती तरी महादेव जाणकरांनी तुम्हाला घाम फोडला...

प्रवीण गायकवाड हे महादेव जानकर,आण्णासाहेब डांगे,शेंडगे कुटुंबाबद्दल बरंच बोलले आहेत.रासपच्या पक्ष स्थापनेच्या पहिल्या स्टेजवर होतात तर मग नंतर कुठे गेलात ? एका धनगराच पोरगं पक्ष चालवतेय म्हणून तुम्हाला तिथे जावं अस वाटल नाही.तिथे तुम्हाला जात आणि वर्चस्वाची भावना आड आली.

प्रवीण गायकवाड ज्या शरद पवारांची तळी उचलतात त्यांना सवाल आहे की ज्यावेळी सोनिया गांधी बरोबर फारकत घेऊन पवार दिल्लीहून मुंबईत आले त्या विमानतळावर सर्वात पहिला har घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते.त्यावेळी शेंडगे बापूंच स्टेटमेंट होत की मी तमाम धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांना पाठिंबा देतोय.शरद पवार यांनी शेंडगे यांना काय फळ दिलं तर पुढच्याच निवडणुकीत कवठे महांकाळ मतदार संघात शिवाजी शेंगडे यांचा पराभव केला.

माढा लोकसभा मतदारसंघात 6 ते 7 लाख लोक होती तुम्ही माझ्या अडीचशे मतावर बोलताय.मी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते त्यांची काय ग्रामपंचायत होती का इथे ? तरी त्यांनी तुम्हाला घाम फोडला होता.आम्ही वंचित घटकातील आहोत आमची तेवढी हैशियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो.प्रवीण गायकवाड बात बहुजनांची करतात पण काम वतनदारांच करतात.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow