बारामतीत धक्कादायक | बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

Jul 18, 2025 - 10:59
 0  1914
बारामतीत धक्कादायक | बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापकाची गळफास घेऊन आत्महत्या

आय मिरर 

पुण्याच्या बारामती मध्ये बँक ऑफ बडोदा च्या शाखा व्यवस्थापकांन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बारामती मधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदा च्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा 52 वर्ष रा. प्रयागराज उत्तर प्रदेश याने काल गुरुवारी 17 जुलै रोजी रात्री बँकेच्या शाखेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवशंकर मित्रा हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.

शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिट्ठीनुसार त्यांनी पाच दिवसापूर्वीच बँकेकडे अतिरिक्त दबाव सहन होत नसल्याने स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र बँकेच्या वरिष्ठ स्तरावरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर काल गुरुवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली असल्याचं कारण समोर येत आहे अद्याप पोलीस खात्याकडून याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

शिवशंकर मित्रा यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले की, मी शिवशंकर मित्रा, मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावाच्या कारणामुळे आत्महत्या करत आहे. माझी बँकेकडे विनंती आहे की, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त दबाव टाकू नका. सर्वांना आपापल्या जबाबदारीची पूर्णपणे जाणीव आहे आणि ते शंभर टक्के आपले योगदान देत असतात.

मी माझी आत्महत्या पूर्णपणे शुद्धीत असताना व स्वतःच्या इच्छेने करत आहे. त्याच्यामध्ये माझ्या कुटुंबाची कोणतीही चूक नाही. कोणालाही जबाबदार धरू नये. मी फक्त बँकेच्या प्रचंड दबावामुळे आत्महत्या करत आहे.

पत्नी प्रिया यांना उद्देशून त्यांनी, प्रिया, मला माफ कर. माही मला माफ कर ! असे त्यांनी पत्नी प्रिया आणि मुलगी माही यांना लिहिलेलं आहे. त्यांनी शक्य झाल्यास माझे डोळे दान करावेत अशी देखील इच्छा शिवशंकर मित्रा यांनी व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow