'जसे पेरतो तसे उगवते, मग आता का वाईट वाटते?'; भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं पवारांना डिवचलं

Feb 8, 2024 - 12:32
 0  518
'जसे पेरतो तसे उगवते, मग आता का वाईट वाटते?'; भाजपच्या 'या' बड्या नेत्यानं पवारांना डिवचलं

आय मिरर

‘जसे पेरतो तसे उगवते, मागे पवार साहेबांनी तेच केलं. पवार साहेबांनी पक्ष फोडला नव्हता का? पवार साहेब बाहेर पडून मुख्यमंत्री झाले नव्हते का ? ही त्यांची परंपरा आहे मग आता का वाईट वाटते? असा सवाल गिरीश महाजन यांनी उपस्थित करीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना डिवचले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचा निर्णय हा न्यायप्रविष्ट झाला होता आणि न्यायालयाने यावर योग्य निर्णय दिला आहे. शेवटी यावर निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे. या मागे छुपी शक्ती असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत आहे. त्याचा समाचारही मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात काल ६ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या बंडांनंतर राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले.राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा फैसला निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिला.त्यामुळे आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असणार आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन अजित पवार गटाचे अभिनंदन केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow