'महानंदा' गुजरातला चालवायला देणे हे ट्रिपल इंजिन सरकारचे अपयश - खा.सुप्रिया सुळे 

Mar 14, 2024 - 17:09
Mar 14, 2024 - 17:13
 0  446
'महानंदा' गुजरातला चालवायला देणे हे ट्रिपल इंजिन सरकारचे अपयश - खा.सुप्रिया सुळे 

आय मिरर(देवा राखुंडे)

राज्य सरकारने महानंदा ही संस्था गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूरात तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

महानंदासारखा ब्रँड पूर्णपणे पुनर्जीवित करण्याची महाराष्ट्र सरकारला संधी होती. महाराष्ट्रात अनेक उत्तम असे दुधाचे प्रकल्प आहेत जे उत्तम चांगले काम करतात. मग महाराष्ट्र सरकारची कंपनी गुजरात सरकारनं का चालवावी या महाराष्ट्र सरकारला चालवता येत नाहीत का ? तर मग या सरकारने राजीनामा द्यावा. हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश असल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे.यासोबतचं या देशात राज्यात खुप कर्तुत्ववान लोक आहेत. जी आण बाण आणि शान टिकवू शकतात असं देखील सुळे यांनी म्हटले आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत यादरम्यान इंदापूर मधील निमगाव केतकी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो वापरता येणार नसल्याचं म्हटलयं. यापुढे पवार यांचा फोटो वापरणार नाही याबाबत लेखी देखील मागितलं आहे. शिवाय अजित पवार यांच्या गटान घड्याळाच्या चिन्हा ऐवजी स्वतंत्र चिन्ह घ्यावं अशी सूचना ही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.मात्र आपण या संदर्भातील ऑर्डर पाहिली नसल्याने या वरती तूर्तास प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. 

निलेश लंके वसंत मोरे आणि भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा असून आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर मध्ये दौऱ्यावरती आहोत. इंदापूर तालुक्यात सध्या पाण्याचा भीषण प्रश्न जाणवतोय.त्यामुळे राजकीय क्षेत्रात काय चाललंय याकडे माझं लक्ष नाही.या संदर्भातील अधिक माहिती घेऊन आपण यावर सविस्तर बोलेन असं ही त्या म्हणाल्या.याचसोबत वसंत मोरे हे महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेची लढवण्याची घोषणा केलीय. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर मध्ये प्रतिक्रिया दिलीय लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला लढण्याचा अधिकार असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांकडे एक देश एक निवडणुकीचा अहवाल दिलाय मात्र त्या अहवालात रामनाथ कोविंद यांनी काय लिहिलय हे आपल्याला माहीत नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow