त्यांनी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरला, सुपा पोलिसांनी काही तासातच हेरलं आणि पाच जणांना गजाआड केलं

Jun 6, 2025 - 12:38
 0  2147
त्यांनी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरला, सुपा पोलिसांनी काही तासातच हेरलं आणि पाच जणांना गजाआड केलं

आय मिरर 

बारामती तालुक्यातील आंबी गावातील शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आणि नांगर चोरणारे चोरटे सुपा पोलिसांनी 24 तासाच्या आत गजाआड केले आहेत.शेतकरी राजेंद्र बबन खोमणे यांच्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणी सुपा पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून हे पाचही चोरटे बारामती तालुक्यातील विविध भागातील आहेत.

24 तासाच्या आत गुन्ह्याचा उलघडा केल्याने सुपा पोलिसांच कौतुक होतंय.बाळा उर्फ अविष्कार तावरे, धिरज चव्हाण, रोहन माने,चेतन दगडे आणि ओंकार पवार अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी दिलेले माहिती अशी की, बारामती तालुक्यातील आंबी बुद्रुक येथील राजेंद्र बबन खोमणे या शेतकऱ्याचा पाच लाख रुपये किमतीचा जॉन डीअर कंपनीचा 5045 मॉडेलचा ट्रॅक्टर आणि तीस हजार रुपये किमतीचा लोखंडी नांगर दिनांक एक जून रोजी रात्री साडेआठ ते दोन जून रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी केला होता. या संदर्भात संबंधित शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास लावण्या कामी सुपा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन तागडे,महादेव साळुंखे आणि भाऊसाहेब चौधरी यांना योग्य त्या सूचना देऊन तपास पथक रवाना केले होते.

तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आणि तांत्रिक तपास यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संशयीत आरोपी १) बाळा उर्फ अविष्कार संजय तावरे वय २३ वर्षे रा. मोरगाव ता. बारामती २) धिरज संदिप चव्हाण वय १८ वर्षे रा.मुर्ती ता. बारामती ३) रोहन ज्ञानेश्वर माने वय १९ वर्षे रा. मोढवे ता. बारामती ४) चेतन कानोबा दगडे वय २५ वर्षे रा. मोढवे ता. बारामती आणि ५) ओंकार रमेश पवार वय २७ रा. मोरगाव ता. बारामती जि.पुणे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी संबंधित गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

सदर आरोपींकडून चोरी केलेला ट्रॅक्टर आणि लोखंडी नांगर असा पाच लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सदर आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार वसंत वाघोले करत आहेत

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली, सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी,पो हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत,संदिप लोंढे,विशाल गजरे,दत्तात्रय धुमाळ, पो.कॉ. किसन ताडगे,महादेव साळुंके,भाऊसाहेब चौधरी,ऋषीकेश विर, निहाल वणवे, सुरज साळुंके, सचिन दरेकर,सागर वाघमोडे, तुषार जैनक, सचिन कोकणे,आदेश मवाळ यांनी केली

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow