मोठी बातमी | सचिन सातव यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा ; या बँकेची खांद्यावर होती जबाबदारी

Jan 15, 2026 - 20:18
Jan 15, 2026 - 20:24
 0  1522
मोठी बातमी | सचिन सातव यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा ; या बँकेची खांद्यावर होती जबाबदारी

आय मिरर 

बारामती नगर परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सातव यांनी दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सचिन सातव यांच्या खांद्यावरती होती. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सचिन सातव यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.

दि बारामती सहकारी बँकेच्या सभागृहात आज संचालक मंडळाची बैठक पार पडली. आणि या बैठकीत सचिन सातव यांनी दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. या बैठकीदरम्यान सातव यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बँकेच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याबद्दल संचालक मंडळाने त्यांचे आभार मानले व पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा ही दिल्या.

सचिन सातव यांनी दि बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापन मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर ओंकार किशोर देवळे यांची व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणून निवड केली आहे.

दि बारामती सहकारी बँकेच्या आजअखेर ठेवी प्रमाण रू. २२४७ कोटी, कर्जवाटप रू. १३८२ कोटी व गुंतवणूक रू. १००९ कोटी तर बँकेचा निव्वळ एन.पी.ए. १.४६% व भांडवल पर्याप्तता प्रमाण (CRAR) १६.१९% अशी बँकेने प्रगती केलेली आहे. बँकेच्या पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नाशिक व रायगड या सहा जिल्हयांत ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष कार्यरत आहे.

या प्रसंगी बँकेचे मावळते अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्षा सौ. नुपूर शहा (वडूजकर), तज्ञ संचालक प्रीतम पहाडे (सी.ए.), एडवोकेट शिरीष कुलकर्णी अध्यक्ष व्यवस्थापन मंडळ तसेच संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, विजयराव गालिंदे, देवेंद्र शिर्के,उध्दव गावडे, नामदेवराव तुपे,जयंत किकले, रणजित धुमाळ,मंदार सिकची, डॉ.सौरभ मुथा, संचालिका डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक एडवोकेट रमेश गानबोटे तसेच कार्यकारी संचालक विनोद रावळ व मुख्यालयातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow