दौंड मध्ये मुद्रांक विक्रेत्याची आत्महत्या ; 13 जणांविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल

May 12, 2026 - 15:23
May 12, 2026 - 15:30
 0  97
दौंड मध्ये मुद्रांक विक्रेत्याची आत्महत्या ; 13 जणांविरोधात दौंड पोलिसात गुन्हा दाखल

आय मिरर 

पुण्याच्या दौंड मध्ये एका मुद्रांक विक्रेत्याने सोमवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. आर्थिक गुंतवणुकीतून ही घटना घडली आहे.

विवेक शंकर गटने असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात 13 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

1) संजय भिमराव बारवकर दौंड , 2) अरीफ शमशुददीन शेख दौंड , 3) प्रकाश आबाजी भालेराव दौंड ,4) अख्तर अहमद शेख दौंड, 5) आदित्य सुधीर जगताप (पुणे ) ,6)शंकर रमेश वाघमारे दौंड 7) राजू भीमराव बारवकर 8) शितोळे ,9) सोनवणे ,10) चोप्रा ,11) कुलकर्णी (मॅडम) ,12)शिंदे ,13) मुल्ला (मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संबंधित प्रकरणातील आरोपींनी विवेक शंकर गटने यांना त्यांच्या ओळखीतील काही व्यक्ती फायनान्स कंपनीचे कर्मचारी आहेत असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी काही पैसे आणि सोन्याच्या मौल्यवान वस्तू घेतल्या मात्र त्या परत केल्या नाहीत.

याच कारणातून विवेक गटने यांनी आत्महत्या केल्या असून संबंधित आरोपींची नावे त्यांनी एका त्यांच्याकडील वहीत लिहिल्याची माहिती आहे. 

यावरून दौंड पोलिसात या तेरा व्यक्तींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow