बारामतीत धक्कादायक | शिवी दिल्याच्या कारणावरून बारामती शहरात एकाची निर्घृण हत्या

Dec 15, 2025 - 11:41
Dec 15, 2025 - 11:46
 0  3485
बारामतीत धक्कादायक | शिवी दिल्याच्या कारणावरून बारामती शहरात एकाची निर्घृण हत्या

आय मिरर 

पुण्याच्या बारामती मध्ये शिवी दिल्याच्या कारणावरून एकाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून दोन मित्रात वाद झाला आणि त्यानंतर हा वाद एवढा निकोपाला गेला की यामध्ये अविनाश उर्फ माऊली लोंढे रा. मळद, शेंडेवस्ती बारामती याची हत्या करण्यात आली आहे. 

त्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती मिळत असून बारामती शहर पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे. 

बारामती शहरातील लेंडी पट्टी भागात रात्री उशिरा हे धक्कादायक घटना घडली आहे. नेमकी ही हत्या शिवी दिल्याच्या कारणातून झाली की अन्य काही कारण असावे याचा अधिकचा तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

या संदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये मयत अविनाश उर्फ माऊली लोंढे याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून समिर इकबाल शेख, वय 25 वर्षे रा. देवळे पार्क सोसायटी, पहिला मजला, मळद रोड, बारामती आणि प्रथमेश राजेंद्र दळवी, वय 20 वर्षे रा. जगताप मळा, खंडोबनगर, ईदगाह जवळ, बारामती अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी 14 डिसेंबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास बारामती शहरातील लेंडी पट्टी येथील वेताळबाबा मैदानाचे मधोमध समिर इकबाल शेख,प्रथमेश राजेंद्र दळवी या दोघांनी मिळुन संगणमताने अविनाश उर्फ माऊली याने त्यांना शिवीगाळी केल्याच्या कारणावरून डोक्यात दगडाने ठेचुन त्याचा खून केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow