भिगवण बारामती राज्यमार्गावर अपघातांचा सिलसिला ; या आहेत महत्त्वाच्या तीन घटना
आय मिरर
पुण्याच्या इंदापूरातील भिगवण बारामती राज्य मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याच चित्र पहायला मिळत आहे.एकापाठोपाठ एक अपघात होतायत.शनिवारी रात्री 11 च्या सुमारास देवकाते वस्ती नजिक बारामती भिगवण रोडवर मालवाहतूक टेम्पो आणि ऊस वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला.सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
यावेळी दोन्हीही बाजूंनी वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.जवळपास एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान भिगवण पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शेटफळगढे परिसरातील अपघातात शिक्षकांचा मृत्यू...
भिगवण बारामती मार्गावर शेटफळगढे चौकात चार चाकी टेम्पो आणि दुचाकी चा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील शिक्षक महेंद्र श्रीहरी भोसले गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात टेम्पो चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू...
भिगवण बारामती राज्यमार्गावर 6 डिसेंबरच्या रात्री पिंपळे गावच्या हद्दीत साडेदाहा च्या सुमारास ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालकाचा देखील आगीमुळे मृत्यू झाला, तर दोन्ही वाहन जळून खाक झाली.
हा अपघात एवढा भीषण होता की ट्रॅक्टर हा ट्रकच्या खाली शिरल्याने ट्रॅक्टरचे दोन भाग झाले, यामध्ये ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मध्ये अडकून राहिला.या अपघातात ट्रक चालकाचाही ताबा सुटला आणि ट्रक उलटला. ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मध्ये अडकल्याने त्याचा या आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला.
मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालकाचा उर्मटपणा समोर...
दरम्यान याच मार्गावर मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालकाचा उर्मटपणा समोर आलय.ऊसाने भरलेल्या ट्रॉली हा मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅक्टर चालक रात्रीच्या वेळी तो रस्त्यावरून नागमोडी वळण घेत फिरवत असल्याच समोर आलय. बारामती भिगवण मार्गावरील ही घटना आहे.त्याचा हा उर्मटपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो, हे काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर या तरुणांनी या ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टर थांबवून चांगलाच चोप दिलाय आणि यानंतर त्याला भिगवण पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
हा व्हिडिओ समोर येण्याच्यापूर्मा दोन अगोदरच याच मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला होता.दोन्ही वाहने यात जळून खाक झाली होती.ट्रॅक्टर चालकाचा देखील यामध्ये होरपळून मृत्यू झाला होता. अस असताना मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालक अशा पद्धतीने बेफिकीरपणे वाहन चालवत असल्याचं या व्हिडिओतून समोर आलं.
What's Your Reaction?