मोठी बातमी | कर्नाटकात थरार...गळा चिरला,कारने चिरडले ; बारामतीच्या महिलेची भररस्त्यात हत्या...

Mar 27, 2026 - 17:43
Mar 27, 2026 - 17:56
 0  3517
मोठी बातमी | कर्नाटकात थरार...गळा चिरला,कारने चिरडले ; बारामतीच्या महिलेची भररस्त्यात हत्या...

आय मिरर 

पत्नीचा गळा चिरुन, कारखाली चिरडत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आला आहे.शैला असे खून झालेल्या २८ वर्षीय महिलेचे नाव आहे.यानंतर कर्नाटक पोलिसांनी संशयित आरोपी पती अक्षयला बेड्या ठोकल्या आहेत.हे दाम्पत्य मूळचे महाराष्ट्रातील बारामतीचे असून, देवदर्शनाला गेले असता कलबुर्गी जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.आरोपी पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्यानंतर तिच्या अंगावरुन थेट कार चालवली हे या व्हिडीओ मध्ये कैद झाले आहे.या घटनेबाबत नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आणि पत्नी शैला कलबुर्गी जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. गाणगापूरला जात असताना रस्त्यात बल्लुरगी येथे पती पत्नी मध्ये काडक्याचे भांडण झाले. संतापलेल्या अक्षयने रागाच्या भरात पत्नी शैलाला कारच्या बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

 

हा सर्व प्रकार स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.यानंतर अक्षयने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरला व रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या शैलाला कारखाली देखील चिरडले. यातच तिचा मृत्यू झाला. 

या घटनेचे वेगवेगळे दोन व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत. व्हिडीओत पीडित महिला मदतीसाठी आक्रोश करताना दिसत आहे. दरम्यान, संशयित पतीने पत्नीच्या हत्येचा कट पूर्वीच रचल्याचा संशय पोलिसांना असून देवदर्शनाच्या नावाखाली त्याने फूस लावून पत्नीला कर्नाटकात आणल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मृत शैला आणि पती मूळचे महाराष्ट्रातील बारामती मधील आहेत. त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. अक्षयला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.चारित्र्याच्या संशयावरुन अक्षयने पत्नीच्या हत्येचा कट रचला होता, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास कलबुर्गी पोलीस करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow