बारामती परिसरातून शेळ्या आणि बोकडं चोरणारा अशोक जाधव वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात, बारा लाखांच्या मुद्देमाला सह पोलिसांनी हस्तगत केलं कोयता तलवारी अन् बरच काही
आय मिरर
बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या शेळ्या आणि बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला या टोळीकडून पोलिसांनी तब्बल 12 लाख 95 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथून अशोक बाबुराव जाधव याला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत. अशोक बाबुराव जाधव यांच्यावर वडगाव निंबाळकर लोणंद आणि हडपसर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे देखील दाखल आहेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पिक अप गाडी मधून 2 तलवारी, 3 कोयते, 1 लोखंडी रॉड, 1 स्क्रू ड्रायव्हर, 1 तार कटर, 1 चाकू, 1 लाकडी काठी, 1 प्लॅस्टीक पाईप आदी साहित्य जप्त केले आहे. सदर टोळी कडून आणखीन मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता वडगाव निंबाळकर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे वाघळवाडी व वाणेवाडी या परिसरात बोकड व शेळी चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली.
त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी तात्काळ या गुन्ह्याचा उलगडा करण्याच्या कामी पोलीस पथकाची नियुक्ती केली पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे सटवाई कॉलनी शिरवळ येथील अटक आरोपी अशोक बाबुराव जाधव वय 55 वर्ष राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्या गोठ्याावरती गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी नंबर एम.एच.11 डी.डी.4562 ही व पुणे जिल्ह्यातील बारामती, जेजुरी व सातारा जिल्ह्यातील खंडाळा फलटण या तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहुन चोरून आणलेल्या शेळ्या मिळून आल्या.
सदर ठिकाणी यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेळ्या ओळखल्यानंतर दोन पंचा समक्ष सदर चोरून आणलेल्या शेळ्यांचा सविस्तर पंचनामा करून गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत.
यातील अटक आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा गुन्हा अटक आरोपी, एक विधी संघर्ष ग्रस्त बालक व आणि फरारी आरोपी प्रकाश अशोक जाधव,मयूर अशोक जाधव दोन्ही राहणार शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा व निलेश, राहणार वाकड पुणे पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील फरारी आरोपी हे सराईत तडीपार केलेल गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी आरोपीच्या गोठ्यातून एकूण 32 नग शेळी (18) बोकड (10) व लहान पिल्ले (04), तसेच गुन्ह्यात वापरलेली 1 पिकअप असे एकूण 12,95,850/- मुद्देमाल गुन्ह्याच्या तपास कामी जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रमेश नागटिळक, हे करीत आहेत.
या गुन्ह्यातील अटक आरोपी जाधव यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे लोणंद पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे तर हडपसर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्य पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, दिपक वारूळे,पोलीस हवालदार रमेष नागटिळक, पोपट नाळे, अमोल भोसले, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, महेश पन्हाळे, सादिक इनामदार, कुंडलिक कडवळे, सागर चौधरी, तौफीक मणेरी, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, पोलीस शिपाई आबा जाधव, धनंजय भोसले, नरेंद्र यादव, विलास ओमासे, सुरज धोत्रे, नागनाथ परगे, विकास येटाळे,भानुदास सरक यांनी मिळून केली.
What's Your Reaction?