बिग ब्रेकिंग | पिस्तुलाचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर अत्याचार ; संशयित आरोपी अटकेत 

Mar 27, 2026 - 16:38
Mar 27, 2026 - 17:01
 0  3824
बिग ब्रेकिंग | पिस्तुलाचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर अत्याचार ; संशयित आरोपी अटकेत 

आय मिरर 

दौंड तालुक्यातील मुकदमवाडी कुरकुंभ परिसरात एका 32 वर्षीय महिले वरती जबरदस्तीने अत्याचार करण्यात आलाय. यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 25 मार्च 2026 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुकादमवाडी कुरकुंभ हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

आरोपींने संबंधित महिलेला लिफ्ट देण्याचा बहाना केला आणि त्यानंतर तिला पिस्तुलाचा धाक दाखवत तिच्यावरती अत्याचार केल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

दौंड पोलिसांनी खडकी येथील संशयित आरोपी अमोल साहेबराव काळे याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करत आहेत.

दौंड पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत काय...

संबंधित पीडित महिलेच्या तक्रारीवरून दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित महिला ही 25 मार्च 2026 रोजी इंदापूरच्या भिगवण मधून पुणे पिंपरी चिंचवड येथे जाण्यासाठी निघाली होती.पिक अप वाहनातून पीडिता कुरकुंभ येथील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पोहचली.पुढील वाहन पकडण्यासाठी ती रस्त्याच्या कडेला  प्रतिक्षेत थांबली.

याच वेळी एक काळया रंगाची कारण पिढीते जवळ आली. तुम्हाला कुठे जायचं आहे असं विचारलं, त्यावर पीडित महिलेने आपल्याला पुण्याला जायचं आहे असं सांगितलं. आरोपींना मी देखील पुण्याला निघालो आहे चला तुम्हाला सोडतो असं सांगितलं.

आरोपींना विश्वास संपादन करून  पीडित महिलेला आपल्या गाडीत बसवलं. आरोपींना पीडीतेची विचारपूस करत ओळख निर्माण केली, याच वेळी पीडित महिलेने देखील संबंधित आरोपीला त्याचं नाव विचारलं होतं. त्यानंतर मात्र आरोपीचा इरादा बदलला. त्याने संबंधित पीडित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावरती अत्याचार केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow