दौंडच्या पाटस टोलवर सापळा रचून पकडला लाखोंचा अवैद्य मध्य साठा,पाच जणांना घेतलं ताब्यात

Jul 21, 2025 - 17:13
Jul 21, 2025 - 17:13
 0  1867
दौंडच्या पाटस टोलवर सापळा रचून पकडला लाखोंचा अवैद्य मध्य साठा,पाच जणांना घेतलं ताब्यात

आय मिरर

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक करून पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावर सापळा रचून तब्बल ३१ लाख ५६ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत ४,७७९ मद्याच्या बाटल्या, चारचाकी वाहने, तसेच हॉटेल्स आणि घरांमध्ये साठवलेला बेकायदेशीर मद्यसाठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow