BIG BREAKING मुंबई ड्रग्स प्रकरणातील आरोपी बारामती तालुका पोलिसांनी पकडला
आय मिरर
मुंबई ड्रग्स प्रकरणातील आरोपीला बारामती तालुका पोलीस आणणे बेड्या ठोकल्या आहेत.50 लाखांच्या एमडी ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामती पोलिसांनी अटक केली आहे.समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख वय २०, रा. वसई असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 सप्टेंबर रोजी मुंबईतील नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्याने शहबाज हमीद शेख,योगेश राजू राठोड,जफर आसिफ शेख,बाबू शेख आणि समीर शेख यांच्याविरुद्ध कारवाई सुरू होती.या आरोपी सर्व आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापैकी समीर उर्फ नूर मोहम्मद अस्लम शेख (वय २०, रा. वसई) हा फरार असून बारामती परिसरात असल्याची माहिती वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी बारामती तालुका पोलिसांना दिली होती. यानंतर बारमध्ये तालुका पोलीस पथकाने शोधमोहीम राबवली.समीर उर्फ नूर मोहम्मद शेख हा बारामती शहरात वास्तव्यास असून तो 'ब्रँड रिव्हर' या कपड्याच्या दुकानात काम करतो अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर,पोलिसांनी हुशारीने आखलेल्या योजनेनुसार पोलीस पथकाने पाहणी करत आरोपीची ओळख पटवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ताब्यात घेतले.बारामती पोलिस ठाण्यात चौकशी दरम्यान त्याने तुळींज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कबूल केले.
बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयास माहिती देऊन आरोपीस मीरा भाईंदर पोलीस,तुळींज पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक राख, पोलीस हवालदार कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स.पो.नि. विक्रम पवार,सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ,सुरेश बडे आणि पोलीस अंमलदार निलेश वाकळे,राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?