वेळ पहाटे सव्वादोनची ! पाच मिनिटात उरला फक्त सांगाडा ; 50 जणांचा जीव वाचला : इंदापूर बस स्थानकावरील थरारक घटनेची इनसाइड स्टोरी...

Oct 26, 2025 - 10:32
Oct 26, 2025 - 10:57
 0  2356
वेळ पहाटे सव्वादोनची ! पाच मिनिटात उरला फक्त सांगाडा ; 50 जणांचा जीव वाचला : इंदापूर बस स्थानकावरील थरारक घटनेची इनसाइड स्टोरी...

आय मिरर 

पुण्याच्या इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झालीय. या एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तर या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालंय.

एम एच 20 बी एल 4233 क्रमांकाची ही धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली. याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. 

ज्यावेळी आग लागली त्यावेळी बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बसचा पूर्ण नुकसान झालंय.

अशी घडली घटना...

रात्री 11:00 च्या सुमाराला धाराशिव मधून ही बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. वाहन चालक नेताजी शितोळे आणि वाहक कृष्णा कांबळे प्रवास करीत करीत पावणेदोन च्या सुमाराला इंदापूर बस स्थानकावर पोहोचले. या ठिकाणी बसची नोंदणी करण्यासाठी पंधरा मिनिटे स्टे घेतला. याच दरम्यान बस मधील वाहक आणि चालक तर काही प्रवासी बस बाहेर पडलेले होते तर काही प्रवासी बस मध्येच झोपलेल्या अवस्थेत होते. 

याचवेळी एका प्रवाशाला बसच्या इंजिनच्या खाली थोडासा जाळ सुरू झाल्याचे निदर्शनास आले. याचवेळी त्या ठिकाणाहून धूर देखील बाहेर पडत होता. हीच बाब बसचे चालक आणि वाहक यांच्याही निदर्शनास आली.तात्काळ बसमधील प्रवाशांना गाडीच्या बाहेर पडण्याच आवाहन केलं गेलं. बसचे वाहक आणि चालक स्वतः बस मध्ये शिरले बस मध्ये असलेल्या प्रवाशांचं साहित्य त्यांनी बसच्या बाहेर फेकलं. अगदी पाच मिनिटात ही बस रिकामी झाली. 

बस मध्ये आणि स्थानकावर अग्निशामक सेफ्टी यंत्रणा नव्हती....

साधारण पावणे दोन वाजता ही बस इंदापूर बस स्थानकामध्ये दाखल झाली. बसच इंजिन चालूच होतं,इंजिन चालू ठेवून बस चालक बसच्या खाली उतरला. बसची नोंदणी करण्यासाठी बस स्थानकात गेला. याच वेळी बस मधून काही उतरलेल्या प्रवाशांना बसच्या इंजिनच्या खाली जाळ सुरू झाल्याचे निदर्शनास आलं. ही बाब वाहन चालक आणि वाहकाच्या ही निदर्शनास आली.मात्र तातडीने आग विझवण्यासाठी बसमध्ये कोणत्याही प्रकारची अग्निशामक सेप्टी यंत्रणा उपलब्ध नसल्याचा खुलासा वाहन चालकाने केला आहे. त्यामुळे आग विझवता आली नाही.

अशी घटना घडल्यानंतर सुरक्षेचा भाग म्हणून इंदापूर बस स्थानकावर अग्निशामक यंत्रणा होती का असं बस स्थानक प्रमुख वायदंडे यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी अशी कोणतीही यंत्रणा बस स्थानकावर नसल्याचा खुलासा केला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व स्थानकांपैकी इंदापूर हे एक बस स्थानक आहे. या बस स्थानकाला मराठवाड्याच प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. औसा निलंगा लातूर बार्शी कुर्डूवाडी सोलापूर कर्नाटक यास अनेक बसेस याच बस स्थानकातून पुढे मार्गस्थ होतात. 24 तासात 800 पेक्षा अधिक बसेस ची आवक जावक या बस स्थानकावर होते हजारो प्रवासी याच बस स्थानकावरून प्रवास करीत असतात. मात्र बस स्थानक निर्माण झाल्यापासून या बस स्थानकावर ती अग्निशामक यंत्रणा नसणं ही मोठे खेदाची बाब आहे असं म्हणावं लागेल.

इंदापूर बस स्थानकावर आगीची घटना घडल्यानंतर काही वेळातच इंदापूर बस आगारातून काही कर्मचारी अग्नी सुरक्षा यंत्रणा घेऊन इंदापूर इंदापूर बस स्थानकात दाखल झाले. मात्र तोपर्यंत विलंब झाला होता. याच दरम्यान इंदापूर नगर परिषदेची अग्निशामक यंत्रणाही दाखल झाली होती.

प्लास्टिकच्या वापरामुळे आगीचे लोट...

सध्याच्या बसेस मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा जास्तीत जास्त वापर केला जातोय. ही बस देखील तशाच पद्धतीची होती. त्यामुळे बसला आग लागताच बस मधील प्लास्टिक साहित्याने मोठ्या प्रमाणात आग पकडली. ज्यामुळे ही आग आटोक्यात आणण कठीण झालं. याशिवाय या बस मध्ये काही प्लायवूडचाही वापर केलेला होता त्यामुळे क्षणार्धात या बसने चारी बाजूंनी पेट घेतला. 

या बस मध्ये जवळपास 50 प्रवासी होते मात्र बसचे चालक वाहक आणि काही प्रवासी यांच्या समय सूचकतेमुळे आणि जागृतपणामुळे या सर्वांचा जीव वाचला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. प्राथमिक दृष्ट्या इंधन गळतीमुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow