हातचलाखीने ८ हजार रुपये लंपास करणारा आरोपी दौंड पोलिसांनी केला गजाआड

Nov 29, 2025 - 08:23
 0  272
हातचलाखीने ८ हजार रुपये लंपास करणारा आरोपी दौंड पोलिसांनी केला गजाआड

आय मिरर

बँकेतून काढलेल्या पैशांमध्ये काही नोटा खराब आहेत तुमचे पैसे मी मोजून देतो माझ्याकडे द्या असं सांगत मोठ्या हातचलाकीने पैशाच्या बंडल मधून आठ हजार रुपये ढापणाऱ्या आरोपीला दौंड पोलिसांनी गजाआड केल आहे.सरफराज मान्नु इराणी याला अस ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दौंड तालुक्यातील नानविज गावातील शेतकरी सुदाम रंगनाथ कुदळे यांनी दौंड येथील एका बँकेतून ९५ हजार रुपये काढले होते. 50 हजार रुपये खिशात ठेवले आणि उर्वरित 45 हजार रुपये मोजत असताना सरफराज इराणी त्यांच्याजवळ आला, यात काही नोटा खराब आहेत माझ्याकडे द्या मी तुम्हाला मोजून देतो असं म्हणत त्यांचा विश्वास संपादन करीत त्यातून आठ हजार रुपये त्यांनी लंपास केले.

मात्र कुदळे यांना इराणी कडून पैसे मोजून परत मिळाल्यानंतर कुदळे यांनी पुन्हा मोजणी केली असता ४५ हजार रुपयांपैकी तब्बल ८ हजार रुपये कमी असल्याचे लक्षात आले.दरम्यान, बँकेत कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे संशयिताला तिथेच पकडण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow