चोरांनी राज्य बदलले, पण शिक्रापूर पोलिसांची नजर चुकली नाही ; वाचा सविस्तर 

Nov 2, 2026 - 07:37
Nov 2, 2026 - 07:40
 0  76
चोरांनी राज्य बदलले, पण शिक्रापूर पोलिसांची नजर चुकली नाही ; वाचा सविस्तर 

आय मिरर 

डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथील कंपनीतून पाच लाख रुपये किमतीचे सर्व्हे मशिन चोरी करणाऱ्या आरोपींचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीला हरियाणातून, तर दुसऱ्याला पुण्यातून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

डिंग्रजवाडी येथील इगवुड प्रा.लि.स्कॅलार स्पेसेस कंपनीमधून जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणारे सर्व्हे मशिन असा पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४४, रा.चिखली प्राधिकरण, चिंचवड,पुणे) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१), ३०५, ३१७(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासी अधिकारी पोलीस हवालदार अजित इंगवले व गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.

त्यानुसार तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे हरी किशन जाटो (वय २४, रा.जोधपूर,राजस्थान) याला हरियाणा राज्यातून, तर अफाकजुद्दीन मुंताजिमुद्दीन काझी (वय ३६, रा.खडकी) याला विश्रांतवाडी, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार व शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार अजित इंगवले, रोहिदास पारखे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, गणेश कुदळे तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे, भारत भोसले, ललित चकनारायण आणि मयूर कुंभार यांचा समावेश होता. पुढील तपास अजित इंगवले करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow