दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दहा मोटरसायकल जप्त

Nov 3, 2026 - 07:29
Nov 3, 2026 - 07:30
 0  399
दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दहा मोटरसायकल जप्त

आय मिरर 

बारामती एमआयडीसी आणि इतर परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.इमरान फिरोज शेख आणि श्री उर्फ श्रीराज नवनाथ वाघंबरे अशी अटक केलेल्या संक्षित आरोपींची नावे असून हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आहेत. बारामती तालुका पोलिसांनी विविध दाखल गुन्ह्यातील 10 दुचाकी आणि दोन मोबाईल या संशयित आरोपींकडून हस्तगत केले आहेत.

बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास पियुष मनोजकुमार तुशबंड वय २१ वर्षे, रा. खंडोबानगर बारामती यांची होंडा कंपनीची काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल नंबर एम.एच.४२/बी.क्यु/०६४४ आणि सदर मोटार सायकलचे सिटमध्ये ठेवलेले दोन व्हिवो कंपनीचे मोबाईल हॅन्डसेट असे डायनामिक्स डेअरी बारामती समोरुन चोरीला गेली होती या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयातील मोटार सायकचे चोरीचे अनुशंगाने गोपनिय माहिती, तांत्रीक विश्लेषण करुन सदरचा गुन्हा हा संशयित आरोपी इमरान फिरोज शेख वय २१ रा. अकलुज यशवंतनगर ता. माळशिरस आणि श्री उर्फ श्रीराज नवनाथ वाघंबरे वय २१ वर्षे, रा. विझोरी ता. माळशिरस जि.सोलापुर तसेच एक विधीसंघर्षीत बालक यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली.

यातील संशयित आरोपी इमरान शेख आणि श्री उर्फ श्री राज वाघंबरे यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चोरीस गेली मोटार सायकल व मोबाईल फोन असे मिळुन आले आहेत. पोलिसांनी सदरचा मुद्देमाल जप्त केला असुन आरोपीस सदर गुन्हयाचे कामी अटक केली आहे.

सदर अटक आरोपींकडे अधिक तपास करता त्यांनी बारामती येथुन आणखी ३ मोटार सायकली चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली.एकुण ४ मोटार सायकली, दोन मोबाईलस असा एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडुन हस्तगत केला असुन दाखल गुन्हयाचा तपास चालु आहे.

तसेच दाखल गुन्हयाचे तपासात बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या सहा पुण्यातील मोटरसायकली संशयित आरोपी गणेश शिवा काळे वय २९ वर्षे, रा. मोरेवस्ती वरकुटे खुर्द ता. इंदापुर २) प्रज्वल प्रतापराव मुंडफुणे पाटील वय २४ वर्षे, रा. महाळुंग ता. माळशिरस सध्या रा.पिटकेश्वर रोड निमगाव केतकी ता. इंदापुर यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर वरील आरोपींनी चोरी केलेल्याा एकुण ०६ मोटार सायकल असा एकुण २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडुन हस्तगत केला असुन अशा एकुण १० मोटार सायकलची एकुण ४,३५,०००/-रुपये किंमतीचा मुददेमाल आरोपींकडुन बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी नारायण पवार, स.पो.नि. विक्रम पवार, ग्रेड पोसई श्रीरंग शिंदे, तसेच गुन्हे शोध पथकाचे सहा फौजदार सुरेंद्र वाघ, पो.हवा. भारत खारतोडे, पो. हवा. सुधिर काळे, पो.हवा. योगेश टिळेकर, पो.हवा. किशोर विर, पो. हवा. सागर देशमाने, पो. कॉ. मनोज पवार, पो.कॉ. जितेंद्र शिंदे, अवधुत शिंदे, पो. कॉ. शाहरुख शेख, आर्यन कदम, यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा. सुधीर काळे हे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow