दौंडच्या हातवळण परिसरात आढळले मृतावस्थेतील नवजात अर्भक
आय मिरर
दौंड तालुक्यातील हातवळण परिसरात पुरुष जातीचे मृतावस्थेतील नवजात अर्भक आढळून आले आहे. दरम्यान घटनास्थळी यवत पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोग्य विभागाच्या मदतीने मृतावस्थेतील नवजात अर्भक पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल येथे पाठविले आहे.
मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हातवळण गावाच्या परिसरात एका घराच्या समोर ही घटना निदर्शनास आली.या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संबंधित व्यक्तींना यवत पोलिसांना या संदर्भात तात्काळ कल्पना दिली. घराच्या समोर एक जन्मलेलं पुरुष जातीचं अर्भक दिसून येत आहे.त्याचा मानेपासुन चेहरा व डोके नाही तसेच त्याचा उजवा हात ही नसून ते कुत्र्यांनी खाल्लेला असावा असा अंदाज देखील वर्तवण्यात आला.
यानंतर तात्काळ यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले यानंतर या मृत अर्भकास वैद्यकीय तज्ञांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ते ससून रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले आहे पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?