दौंड हादरलं ! मुलीने मार्कशीट वर खाडाखोड केली बापाचा राग अनावर झाला अन् घडली ही विचित्र घटना

May 5, 2026 - 15:59
May 5, 2026 - 16:02
 0  276
दौंड हादरलं ! मुलीने मार्कशीट वर खाडाखोड केली बापाचा राग अनावर झाला अन् घडली ही विचित्र घटना

आय मिरर 

दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे हद्दीत हनुमान वस्ती,काळे वस्तीजवळ एका नऊ वर्षाच्या मुलीने तिच्या भावाच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरून जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्या मुलीची लाकडे कापण्याची मशीन गळ्यावर डोक्यावर फिरवून हत्या केली आहे.

अनामिका शांताराम चव्हाण असं मृत पावलेल्या नववर्षीय मुलीचं नाव आहे.यासंदर्भात दौंड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शांताराम दुर्याेधन चव्हाण व चिंगु शिंदबाद भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणातील दोन्हीही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 मे 2026 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास देउळगाव राजे गावचे हददीत हनुमान वस्ती,काळे वस्तीजवळ आरोपीचे राहत्या घरात ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 3 मे 2026 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास आरोपी शांताराम दुर्याेधन चव्हाण याने त्याची नऊ वर्षाची मुलगी अनामिका हिने तिचा भाऊ संस्कार शांताराम चव्हाण याच्या शाळेच्या गुणपत्रीकेवर खाडाखोड केली.याचा राग मनात धरून मुलगी अनामिका शांताराम चव्हाण हिचे गळ्यावर डोक्यावर पाठीमागे व गालावर लाकडे कापण्याची मशीन चालू करून फिरवली.यात तिचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर तिचे प्रेत कपड्यात गुंडाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घर पेटवून दिले. 

यावेळी आरोपी सोबत असणारी महिला चिंगु शिंदबाद भोसले हिने देखील सदरची घटना कोणालाही सांगू नको असे सांगून घटनेची माहिती पाोलीसांपासून लपवून ठेवली. याची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी स्वतःहून पोलीस शिपाई निलेश फडणीस यांच्या फिर्यादीवरून दोघांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा अधिक सत्ता तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow