लिफ्ट देण्याचा बहाणा करून गाडीवर बसवलं अन् घात केला ; शेवटी जाक्या चव्हाण गजाआड झालाच
आय मिरर
पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये 10 सप्टेंबर रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास महिलेला मोटरसायकल वरून लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला भिगवण पोलिसांनी गजाआड केला आहे.जाक्या चव्हाण असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दौंड तालुक्यातील माळवाडी लिंगाळी येथे रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 10 सप्टेंबर रोजी संशय आरोपीने एका महिलेला दुचाकीवरून लिफ्ट देण्याचा बहाणा केला. त्यानंतर मळद गावचे रेल्वे ब्रिज जवळ गेल्यानंतर दुचाकी थांबवली. तिला जीवे मारण्याची धमकी देत झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या संदर्भात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची सहा पथक आरोपीचा शोध घेत होती. शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपी जाक्या कोंडक्या चव्हाण याला ताब्यात घेण्यात आलं असून आरोपीने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड करत आहेत.
सदरची कामगिरी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश बोपडे, गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी मा.डॉ सुदर्शन राठोड, बापूराव दडस पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांचे मार्गदर्शनाखाली
भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, दौंड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, अमीर शेख तसेच भिगवण पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील,पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे, कुलदीप संपकाळ, सहा. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने केली आहे.
What's Your Reaction?