अगोदर रिक्षा चोरली नंतर दुचाकी चोरली पुढे डाव फिस्कटला अन् भिगवण पोलिसांना सापडला

Oct 19, 2025 - 12:08
 0  1704
अगोदर रिक्षा चोरली नंतर दुचाकी चोरली पुढे डाव फिस्कटला अन् भिगवण पोलिसांना सापडला

आय मिरर (निलेश मोरे)

भिगवण पोलिसांनी पोलिस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत असताना एका चोरट्याला गजाआड केलंय. आरोपीच्या ताब्यातून भिगवण पोलिसांनी एक चोरीची दुचाकी आणि एक रिक्षा असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.गणेश गंगाधर टिंगरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

 गणेश टिंगरे याने ही वाहने मिरजगाव व मदनवाडी येथून चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. आरोपीविरुद्ध भिगवण आणि मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारे 7 वाजता अकोले गाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे आणि शहाजी सुद्रीक यांनी एक संशयास्पद मोटारसायकलवर फिरताना पाहिली.

सदर इसमाने आपले नाव गणेश गंगाधर टिंगरे (वय 44, रा. लोहार गल्ली, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच-23 बीई 7395) संदर्भात चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तपासादरम्यान ही मोटारसायकल चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.

त्याच्या ताब्यातून सुमारे 60 हजार रुपयांची स्प्लेंडर मोटारसायकल आणि इतर वस्तू मिळून एकूण सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

चौकशीत आरोपीने कबूल केले की, त्याने 13 ऑक्टोबर 2025 रोजी मदनवाडी गावच्या हद्दीतून पियाजो कंपनीची रिक्षा चोरी केली होती. ही रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली आहे (किंमत सुमारे 40 हजार रुपये). पुढील तपासात समोर आले की मोटारसायकल मिरजगाव येथून चोरी झाली होती.

ही कारवाई प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, संतोष मखरे व शहाजी सुद्रीक यांनी यशस्वीपणे पार पाडली.भिगवण पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे दिपावलीपूर्व काळात चोरीसारख्या गुन्ह्यांवर अधिक नियंत्रण मिळवण्यात मदत झाली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow