गावठी पिस्टल बाळगून दहशत करणारा भिगवण केला जेरबंद

Aug 12, 2026 - 06:20
Aug 12, 2026 - 06:23
 0  592
गावठी पिस्टल बाळगून दहशत करणारा  भिगवण केला जेरबंद

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथे गावठी पिस्टल जवळ बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला भिगवण पोलिसांनी गजाआड केल आहे.सौरभ मारुती पवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

आरोपीने एका व्यक्तीला शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती.त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत आरोपीचा शोध घेतला.आरोपीकडून गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 5 लाख 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

आरोपीला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गुन्हयाचा पुढील तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे हे करीत आहेत.

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ चे सुमारास इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावचे हददीत जमीन गट नंबर १३७ मध्ये म्हसोबाचीवाडी येथील सौरभ मारूती पवार हा त्याचे ताब्यातील स्कॉपीओ गाडी मधुन आला.

त्याचे जवळ गावठी पिस्टल होते.निरगुडे येथील युवराज प्रतापराव भोसले यांना पवार याने तु येथे थांबायचे नाही.तु येथुन निघुन जा, असे म्हणून तु लईच बोलतुस असे म्हणुन शिवीगाळ करून तुला व तुझ्या क्रशर मालकाला गोळयाच घालतो असे म्हणुन धमकी दिली.अशी तक्रार भिगवण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शना खाली

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विठठ्ल वारगड, पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, रणजित मुळीक, यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow