धक्कादायक | कुरकुंभ मध्ये बंदुकीचा धाक दाखवून पावणेदोन लाखांचे दागिने लुटले

Dec 26, 2025 - 15:56
Dec 26, 2025 - 15:58
 0  1500
धक्कादायक | कुरकुंभ मध्ये बंदुकीचा धाक दाखवून पावणेदोन लाखांचे दागिने लुटले

आय मिरर 

दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक दरोड्याची घटना घडली आहे. पुणे सोलापूर महामार्गालगत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये झोपलेल्या कुटुंबावर तीन अज्ञात इसमांनी अचानक हल्ला करीत बंदुकीचा धाक दाखवून एक लाख 75 हजार रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवदर्शन करून पुण्याकडे परतत असताना फिर्यादी प्रदीप सुखदेव धोत्रे हे आपल्या नातेवाईकांसह कुरकुंभ गावच्या हद्दीत पहाटे सुमारे तीन वाजता विश्रांतीसाठी थांबले होते.

त्याच वेळी आरोपींनी कारच्या चालक बाजूची काच फोडून लोखंडी रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात प्रदीप धोत्रे, त्यांचे मावस भाऊ मयूर काकडे आणि मावशी सपना काकडे जखमी झाले.

यानंतर आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत सपना काकडे यांच्या अंगावरील मंगळसूत्र गंठण व कानातील सोन्याचे दागिने असा सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लुटला आणि मोटारसायकल वरून पळून गेले. घटनेनंतर कुरकुंभ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow