या मागणीसाठी राज्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी गेले संपावर, इंदापूर मधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग

Aug 21, 2025 - 18:43
 0  272
या मागणीसाठी राज्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी गेले संपावर, इंदापूर मधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग

आय मिरर 

19 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.यात इंदापूर तालुक्यातील शंभर हून अधिक आंदोलकांचा समावेश असून यामुळे याचा रुग्ण सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांना आंदोलनांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले असून हे कर्मचारी आता संपावर गेले आहेत. 

ज्यांना शासकीय सेवेत दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी करण्यात आली आहे.राज्य सरकारने 14 मार्च 2024 या संदर्भात एक शासन अध्यादेश काढला होता त्यास अनुसरून ही मागणी करण्यात आली आहे.

शासनाने अध्यादेश काढून. आता जवळपास 15 महिने ओलांडले तरी कोणतीही कारवाई न झाल्याने राज्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आता काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

यापूर्वी 11 जुलै रोजी राज्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी मुंबई मध्ये आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले होते.त्यावेळी राज्य सरकारकडून आंदोलकांच्या मागण्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले होते.

परंतु एक दीड महिना ओलांडून देखील कोणताही कार्यवाही न झाल्याने आक्रमक झालेल्या राज्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी आता काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय राज्याचे एकत्रीकरण समितीचे अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक डॉ अरविंद आरकिले आणि सल्लागार हर्षल रणवरे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow