इंदापुरात लोणी देवकर जवळ क्रूजर आणि ट्रकचा भीषण अपघात, क्रूजरमधील तिघांचा जागीच मृत्यू
आय मिरर
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात एका क्रूजर जीपचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झालाय या अपघातामध्ये क्रूजर गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातामध्ये मृत पावलेले तीनही लोक लोणी देवकर एमआयडीसी मधील खाजगी कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार MH14LB 1613 क्रमांकाच्या क्रूजर गाडी मधून हे तीनही कर्मचारी प्रवास करत होते.यावेळी अचानक गाडीचा टायर फुटला आणि रस्ता दुभाजक ओलांडून ही गाडी समोरून येणाऱ्या MH12YQ6603 क्रमांकाच्या ट्रकला धडकली गेली या गंभीर अपघातात क्रूजरमधील चालकासह तिघेजण जागीच मृत्यू पावलेत.
या अपघातात वाहन चालक प्रमोद बाळासो खवळे वय 28 रा. मदनवाडी तालुका इंदापूर पुणे 2) शशांक कोटिया वय 32 गौतमनगर, गिरड ग्वालियर मध्य प्रदेश 3) विजयसिंह राजपूत वय 35 त्रीलोकनगर मध्यप्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आज मंगळवारी 17 मार्च रोजी सकाळी 9 ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीप च्या समोरील भागाचा अक्षरशा या अपघातात चुराडा झाला.
घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर,सहा.फौजदार बालगुडे,सहा.फौजदार जगदाळे,पो.हवा. पाटील,पो.हवा.वागजकर, पो.हवा.पवार, पो.हवा.मारकड,पो. हवा.हंडाळ,पो.कॉ.झगडे व कळसाईत अपघात स्थळी दाखल झाले. अपघात ग्रस्त वाहने बाजूला करत त्यांनी वाहतुकीसाठी मार्ग खुडा करून दिला.
What's Your Reaction?