बिग ब्रेकिंग | भीमा पाटस कारखान्याच्या बगॅसला आग,मोठ नुकसान...
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस डेपोला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीत मोठ्या प्रमाणावर बगॅस जळून खाक झाल्याची माहिती असून,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या आगीत एक वाहन देखिल जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कारखान्याच्या परिसरातील बगॅस ला अचानक आग लागली.या आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.काही क्षणातच आगीने मोठे रूप धारण केले.घटनास्थळी उभा असलेला एक ट्रक देखील या आगीत पूर्ण जळून खाक झाल्याची माहिती आहे.
कारखान्याच्या दक्षिण दिशेला बगॅसचा मोठा साठा असतो,त्याच कारखान्याच्या संरक्षण भिंत बाहेरून मोटेवाडाकरील रोड शेती व कारखाना शाळा आहे.अचानक ही आग लागले ना या परिसरात नागरिकांची मोठी धावाधाव झाली.
या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व संबंधित यंत्रणेत तात्काळ ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सुदैवाने या आगीत कोणतेही जीवित हानी झालेली नाही.
मात्र आगीच्या भक्षस्थानी असलेला मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक झाला आहे. शिवाय बगॅस देखील मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला आहे.
What's Your Reaction?