दौंड मध्ये एसआरपीएफ भरती दरम्यान नशेचा प्रकार,आतापर्यंत 9 जण आढळले दोषी
आय मिरर
दौंड तालुक्यातील SRPF गट क्रमांक 5 येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरतीसाठी आलेल्या काही उमेदवारांकडे नशा करणाऱ्या गोळ्या आणि पावडर आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आज तीन उमेदवारांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 9 उमेदवार नशा पदार्थ वापरताना आढळले असल्याची माहिती असिस्टंट कमांडंट सचिन डहाळे यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी जप्त केलेली पावडर तपासणीसाठी डॉक्टरांकडे पाठवण्यात आली असता ती नशेसाठी वापरली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे काही उमेदवार रनिंग चाचणीपूर्वीच हे पदार्थ घेत असल्याचेही समोर आले असून यामुळे त्यांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो.दरम्यान संशयित उमेदवारांचे रक्त नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाने यापुढे अशा प्रकारांना अजिबात सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
या संदर्भात असिस्टंट कमांडर सचिन डहाळे म्हणाले की राज्यात सर्वच ठिकाणी राज्य राखीव पोलीस बलामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.त्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील एस आर पी एफ गट क्रमांक पाच येथे देखील 16 मार्चपासून भरतीची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये आणि अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यासोबतच राज्य राखीव पोलीस बलाचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच समादेशक यांच्या अध्यक्षतेखाली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड या ठिकाणी 16 मार्चपासून ही प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे.
आज गुरुवारी दोन एप्रिल रोजी देखील भरती प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी तीन वाजता प्रवेशद्वारा वरून उमेदवार आत घेतले. उमेदवारांना प्रवेशद्वारावरच कुठल्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नये अशा सूचना दिल्या जातात. किंवा शरीराला उत्तेजित करणाऱ्या पदार्थाचे सेवन आपण करू नये सूचना दिल्या जातात. तरी देखील काही उमेदवारांनी कागदपत्र तपासल्यानंतर शरीराला अतिउत्तेजित करणारी पावडर तिचा वापर करण्याचा आणि काही गोळ्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा आणि सांगली मधील हे उमेदवार असून एकूण तिघा जणांवर आम्ही कारवाई केली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही पावडर अति उत्तेजक असून मैदानात धावल्यानंतर उमेदवार आपल्या शरीरावरचे नियंत्रण सोडेल आणि तो सैरावैरा दहावी अशा प्रकारचे प्रकार गेल्या पंधरा दिवसात भरती प्रक्रिये दरम्यान सात ते आठ उमेदवारांच्या बाबतीत आढळून आले आहेत.
उमेदवार आपल्या शरीराची जीवाची परवा न करता अशा पावडरचा गोळ्यांचा वापर करून आपल्या शरीराला धोका निर्माण करतात. या ठिकाणी पूर्णपणे पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली जात असून सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोकम सरबत ग्लुकोज टॅबलेट बिस्किट पिण्याचे शुद्ध पाणी यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. चार ते पाच तास भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना थांबायचं आहे. नऊ वाजेपर्यंत उमेदवारांची भरती प्रक्रिया आम्ही पार पडत आहोत. त्यामुळे उमेदवारांनी अशा प्रकारचे कुठल्याही पदार्थाचे सेवन करून आपल्या शरीराला धोका निर्माण करू नये असं आवाहन हे सचिन डहाळे यांनी केले आहे.
भरती प्रक्रियेमध्ये जे उमेदवार अशा पद्धतीचे पावडर किंवा गोळ्यांचे सेवन करताना किंवा त्या जवळ बाळगल्या प्रकरणी आढळलेले आहेत अशांवरती आम्ही कारवाई केली असून पोलिसांमार्फत ही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे भविष्यात भरती प्रक्रियेमध्ये जर कोण उमेदवार अशा पद्धतीने वर्तन करताना आढळला तर अगोदरच्या उमेदवारांवर जी कारवाई झाली आहे तीच कारवाई पुढे देखील केली जाईल असा सूचक इशाराही डहाळे यांनी दिला आहे.
What's Your Reaction?