शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस गाळण्याचा तुमच्यात दम नाही ; काय तुमची अवस्था ! दादांचा नाव न घेता राहुल कुलांवर हल्लाबोल

Oct 18, 2025 - 10:52
Oct 18, 2025 - 10:54
 0  844
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस गाळण्याचा तुमच्यात दम नाही ; काय तुमची अवस्था ! दादांचा नाव न घेता राहुल कुलांवर हल्लाबोल

आय मिरर 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड मध्ये दौंड चे भाजपाचे आमदार राहुल कुल यांचं नाव न घेता भीमा पाटस सहकारी साखर कारखान्या वरून निशाणा साधलाय.त्याच्यानंतर कारखान्याचं काय झालं त्याचं आता राजकारण करत बसत नाही.पण कारखाना होता कोणाचा चालवतोय कोण आलाय कुठनं.आपली आज ही अवस्था आहे का रे. परराज्यातल्या माणसाने येऊन दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला ऊस हा गाळण्याच्या करता आपल्यात कोणाच्यात दम नाही.काय तुमची अवस्था,हे सगळ्या दुनियेला जमतं आणि तुम्हाला जमत नाही.म्हणजे कुठेतरी तुम्ही कमी पडला.याचा काहीतरी विचार करा ना. असं अजित पवार यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.

दरम्यान एक जण म्हणाला दादा पाणी मुरतंय पाणी ; त्यावर अजित पवार म्हणाले तुम्हीच मुरून देता आम्ही पाणी टाकायला आलो नाही.काम करताना उद्याचे 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घ्यायचे असतात.दौंड मधून दीड किलो मीटर अंतरावर आपण 25 कोटी रुपये सीएसआर मधून मिळवून उभा करीत आहोत.

काळाच्या आणि नियतीच्या पुढे आपलं कोणाचं काही चालत नाही.अण्णा आपल्याला सोडून गेले त्यांचं राहिलेलं अधूर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचा आहे. 

पुण्याच्या दौंड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये दौंड चे भाजपचे शहर अध्यक्ष स्वप्निल शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश झाला.दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांनी भाजपचा दौंड मधील मोहरा आपल्या गळाला लावला असून भाजपचा शहराध्यक्ष फोडण्यात अजित पवारांना यश आलं.यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की,पूर्वीचा काळ वेगळा होता आता तसा नाही.रस्ते मोठे करावे लागतील.दौंड मधून आपण रेल्वेच्या लोकलच्या ट्रिप वाढवायला नको का.त्यासाठी तुम्ही योग्य नेतृत्व निवडायला हवे.मला नाईलाज असतो माळेगावला चेअरमन व्हावे लागले.काल मी 3450 रुपये भाव काढला.आणखी शंभर रूपये जास्त देता आला असता सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही.काहींना वाटतं मी रागात बोलतो की काय पण माझा आवाज तसा आहे काय करावे. 

आता पूर्वीसारखे 6 चाकी ट्रक राहिले नाहीत आम्ही पूर्वी बघायचो तो ट्रक सहा चाकी असायचा आणि दहा टन माल न्यायचा. आता डंपर नेतोय सात आणि आठ ब्रास.काही काही ट्रॅक 40 टन माल वाहून नेतोय.त्यामुळे तसे रस्ते करावे लागत आहेत.त्यात राजकीय हस्तक्षेप करून चालत नाही.सर्व काही बदलत चालले आहे.पूर्वी खेळ होते विटी दांडू होते गोठ्या होत्या.आताच्या पोरांना गोठ्या माहित नाहीत असतील माहित पण त्या दुसऱ्या असतील.अस म्हणतास एकच हशा पिकला.

मी मध्यंतरी पूर परिस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो तेवढे बीडमध्ये मला एक महिला भेटली रडून घेऊ सांगत होती दादा माझे पैसे अडकले आहेत.मी एसपींना सांगितलं तपास करा.यावर ते म्हणाले दादा तो मोबाईल वर पब्जी गेम खेळत होता त्यात ते पैसे गेले आहेत.ही असली कार्टी आहेत आई-बाबांनी पण त्यांच्यावर लक्ष ठेवा.

अलीकडे ड्रग्सच प्रमाण वाढलं आहे ते कुठे होत असेल तर लक्षात आणून द्या.आम्ही त्यावर पोलिसांना सांगू पोलिसांनी ऐकलं नाही तर तिथल्या अधिकाऱ्यांवर ॲक्शन घेऊ.मी पोलिसांना तीस ते चाळीस कोटी रुपयांचा गाड्या दिल्या आहेत.करा ना काम,कायदा सुव्यवस्था ठेवा ना.माझ्या आई बहिणींना कुठेही फिरताना भीती राहू नये यासाठी तुमचा दबदबा ठेवा ना. गुंडांचा बंदोबस्त करा त्यांना मकोका लावा आम्ही नाही हस्तक्षेप करणार. असे खडे बोल ही अजित पवार यांनी दौंड पोलिसांना सुनावले.

एक जण अजित पवारांना म्हणाला दादा आमचं दौंड शहर तुम्ही दत्तक घ्या त्यावर अजित पवार म्हणाले दौंड शहर मी जरी दत्तक घेतलं तर चांगल्या लोकांना निवडून द्या ना मी दत्तक घेऊन उरावर काय करू.दिवसा ज्यांच्याबरोबर रात्री पण त्यांच्याच बरोबर रहा.नाहीतर लगेच दुसरीकडे जाल,आपण साथ द्या पुढे जाऊया.आपला समाज दौंड तालुका जिल्हा पुढे गेला पाहिजे. उद्याच्या काळात योग्य उमेदवारांना तरुण रक्ताला अनुभवी व्यक्तींना संधी देण्याचे काम आम्ही करू.

मी अधिकाऱ्याला कशीही वागणूक देत नाही .जर अधिकाऱ्याने चुकीची माहिती दिली तर मी त्याला फैलावर घेतो.मग अधिकाऱ्याने चांगलं काम करावं, उगाच आम्हाला हेलपाटे घालायला लावू नयेत.मला परवा कुरकुंभ ची लोक सांगत होते फॅक्टरीच पाणी सोडत आहे त्यामुळे प्रदूषण होत आहे.बोअर खराब झाले आहेत मी आता तिथे प्रदूषण मंडळाला सांगणार आहे,कंपन्यांना पण सांगणार आहे पैसे कमवत असताना कुरकुंभ करांना का त्रास देतात.असं जर फोन करत असेल तर त्यांचा बंदोबस्त पण करू.

बारामतीत बाराही महिने बाजारपेठ चालते.दीड लाख मुले आणि मुली तिथे शिकतात.मी सर्वांना मदत करतो केवळ बारामतीचा विकास करत नाही. पण झालेली मदत पूर्णपणे खर्च झाली पाहिजे.पैसा नुसता दिला की सर्व होत नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागली काम करावं लागत.सकाळी पहाटे उठून काम करावे लागते.अस म्हणत अजित पवार यांनी हेही स्पष्ट केले की आपण दौंडकरांना देखील विकासाला निधी देत आहोत मात्र त्याचा पुरेपूर वापर व्हायला हवा.

माझ्या बारामती तालुक्यात देखील दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहे.काही मुलं आम्ही नेदरलँड ला पाठवत आहे तिकडची इकडे बोलवत आहोत.मधल्या काळात मी दत्ता मामा ला कृषिखाते दिले त्याला सांगितले तुझी केळी डाळिंब चागलं आहे पण तुझे असून चालणार नाही राज्यातील शेतकऱ्यांची पण असले पाहिजे त्यासाठी निधी लागेल तो देण्याची जबाबदारी या अजित पवारची आहे.माझी 70 एकर शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे आता माझा ऊस एकरी 100 टन निघेल अस मला शास्त्रज्ञांनी सांगितले.आपल्या इथल्या जमिनी आता क्षारपड व्हायला लागल्या आहेत,त्यासाठी आता ठिबक सिंचन असायला हवी.या पद्धतीने जर मका केली तर एकरी 70 क्विंटल निघते.तुम्ही म्हणाला हा संध्याकाळी टाकून आलय की काय.पण मी टाकून आलो नाही. मगाशी एक जण मला टाकून आलेला हातात हात देऊन गेला त्याला मी रामराम केलं,रामकृष्ण हरी केलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow