पुरंदर भागात केळीला पिक विमा द्या ! केळी उत्पादकांची सरकारकडे मागणी
राहुल शिंदे,पुरंदर
गेल्या सहा महिन्यांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे पुरंदर तालुक्यातील केळी उत्पादकांना मोठा फटका बसलाय. पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील अजित कृष्णा धुमाळ यांनी आपल्या अडीच एकर शेतात किडीची बाग लावली होती. मात्र पावसामुळे अनभरात आलेल्या केळी बागेतील 600 ते 700 झाड उन्मळून पडली आहेत.
यामुळे धुमाळ यांचं पाच ते सहा लाख रुपयांच नुकसान झालेय.पुरंदर तालुक्यामध्ये डाळिंब आणि केळीची पुरेशी लागवड होत नसल्याचे कारण देत केळी पिकाला विमा नाकारला जातोय,त्यामुळे या भागातील केळी उत्पादक आणि डाळिंब उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.सरकारने लागवडी खाली कमी क्षेत्र असले तरी या भागासाठी पिक विमा लागू करावा अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून होत आहे.
मागील सहा महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय.त्यातच आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील एका शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली होती.केळीचे पीक चांगल्या पद्धतीने आलं होतं.मात्र ऐन बहरात असलेल्या या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला.
या शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या 2400 केळीच्या झाडांपैकी 600 ते 700 केळीच्या झाडांचे नुकसान झालेय..ही झाडे पाऊस आणि वाऱ्यामुळे उन्मळून पाडलीत.त्यामुळे या शेतकऱ्याचं पाच ते सहा लाख रुपयांच नुकसान झाले आहे.
What's Your Reaction?