मुलं वर्गात होती अन् अचानक खिडकीतून आला भला मोठा साप ; भागवतवाडी शाळेत काय घडलं
आय मिरर
दौंड तालुक्यातील पाटस येथील भागवतवाडी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जीर्ण व कालबाह्य इमारतीतील वर्गखोल्यांमध्ये शिक्षण सुरू असतानाच दुसरी व चौथीच्या वर्गात दोन साप आढळल्याने मोठी खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढून सर्पमित्राच्या मदतीने हे साप पकडण्यात आले.
या १९५० सालच्या धोकादायक इमारती असून अवघ्या दोन वर्गखोल्यांत संपूर्ण शाळा भरवली जाते. पावसाळ्यात पाणी साचणे व परिसरातील वाढलेले गवत यामुळे धोका वाढला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून नवीन इमारतीसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
इमारती झाल्या जीर्ण...
या शाळेची इमारत मिळालेल्या माहितीनुसार 1950 सालातील आहे.त्यामुळे ही इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे.केवळ दोन खोल्यांमध्ये शाळा भरवली जाते. इमारतीच्या आजू बाजूला गवत झाडे झुडपे वाढलेली आहेत.यामुळे अशा घटना या ठिकाणी घडत आहेत.त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत या ठिकाणी नव्याने इमारत उभारण्याची गरज असून सुरक्षित ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळायला हवेत अशी पालकांची मागणी आहे.
What's Your Reaction?