दौंड तालुक्यातील खडकी गावच्या सरपंचपदी सौ.ज्योती सुमित शिंदे यांची निवड 

Jul 18, 2025 - 19:35
Jul 18, 2025 - 20:15
 0  296
दौंड तालुक्यातील खडकी गावच्या सरपंचपदी सौ.ज्योती सुमित शिंदे यांची निवड 

आय मिरर (निलेश मोरे) 

दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.ज्योती सुमित शिंदे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी गुलाल उधळून व पेढे वाटून आनंद साजरा केला.

खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. उज्वला कुचेकर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी गुरुवारी ग्रामपंचायत खडकी कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. 

यावेळी सरपंच पदासाठी सौ.ज्योती शिंदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सौ. वर्षाराणी दळवी यांनी ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी पाटस साखर कारखान्याचे संचालक महेश नाना शितोळे, तसेच ग्रामपंचायतचे माजी सरपंच सविता दत्तात्रय शितोळे, छबाबाई संपत गुणवरे, आकाश शिंदे, राहुल गुणवरे, मोहन काळभोर, जनार्दन कुदळे, राणी आरेकर, रंजना काळे, लाला शेख, रघुनाथ काळे, प्रणाल शितोळे,

राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन काळभोर, सचिन शिंदे, विकास शिंदे, नामदेव शिंदे, दत्तात्रय शितोळे, अनिल गुणवरे, श्रीकांत गुंड, अभिमान सकुंडे, दादा काळभोर, राहुल काळे, विशाल शिंदे व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी डि.वी शिंदे, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरपंच पदी निवड जाहीर होताच गावकऱ्यांनी शिंदे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow