पळसदेव बिजवडीतून दीपक जाधवांना संधी द्या : प्रशांत गलांडे पाटलांची मागणी
आय मिरर
संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ही आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. नुकतीच इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची रचना जाहीर झाली असून त्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी इच्छुक असणारे तयारीला लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत अनेक युवा चेहऱ्यांकडे मतदारांचे लक्ष लागलेले असताना दीपक जाधव यांनाच दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या आखाड्यात उतरवावं अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभा अध्यक्ष प्रशांत गलांडे पाटील यांनी केली आहे.
गलांडे पाटील म्हणाले की,2017 साली दीपक जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी अल्प मताधिक्याने जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर 2022 मध्ये दीपक जाधव यांनी हर्षवर्धन पाटील यांना रामराम ठोकत दत्ता भरणे यांची साथ दिली.
2024 च्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या आणि कर्मयोगी कारखान्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पळसदेव बिजवडी गटात मोठं मताधिक्य मंत्री भरणे यांना मिळालं. यात दीपक जाधव यांच्या माध्यमातून तरुणाईची मोठी फळी भरणे यांच्या पाठीशी उभा राहिली.
नव्यानेच पक्षात आलेली दीपक जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते यांनी हातात हात घालून काम केलं आणि मोठ्या मताधिक्याने भरणे यांना तिसऱ्यांदा विधिमंडळात पाठवलं. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मंत्री भरणे यांनी पळसदेव बिजवडी गटासाठी दीपक जाधव यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवावे.
2017 साली दीपक जाधव यांनी काँग्रेस मधून निवडणूक लढवली होती, त्यावेळी माने यांच्या विरोधात दीपक जाधव यांची ताकद थोडी कमी पडली. पळसदेव बिजवडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून दीपक जाधव यांचा चेहरा मतदारांच्या पसंतीचा असल्याने संपूर्ण ताकद दीपक जाधव यांच्या पाठीशी उभा राहील. त्यामुळे या गटातून दीपक जाधव यांचा विजय निश्चित आहे.
विधानसभा लढवलेल्या मानेंना पक्षाने आदेश दिल्यास लढवावी लागेल जिल्हा परिषद...
परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून इंदापूरचे प्रवीण माने यांनी नुकतीच 2024 ची विधानसभेची निवडणूक लढवली होती. यात माने यांना तब्बल 39 हजार हून अधिक मताधिक्य मिळाले. प्रमुख उमेदवारांमध्ये प्रवीण माने यांनी तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळवली. दोन जुने रोजी प्रवीण माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. 2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांनी दीपक जाधव यांना पराभूत केले. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व आरोग्य सभापती पदाचा बहुमान ही प्रवीण माने यांना मिळाला. त्या माध्यमातून प्रवीण माने यांनी इंदापूर तालुक्यात मोठी विकास कामे केली. आता भारतीय जनता पक्षाने जर प्रवीण माने यांना पळसदेव बिजवडी गटातून जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरण्याचे आदेश दिले तर भाजपाकडून प्रवीण माने पळसदेव बिजवडी गटाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात दिसतील असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
कोण आहेत दीपक जाधव ?
- वयाच्या अठराव्या वर्षापासून गलांडवाडी नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतवर वर्चस्व.
- 2006 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष
- 2011 साली इंदापूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा
- 2017 पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रवीण माने यांच्या विरोधात निवडणूक लढवली.
- 2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत अल्पमताने पराभव.
- 2019 साली काँग्रेस मधून हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर भाजपामध्ये प्रवेश.
- 3 एप्रिल 2022 साली भाजपा मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
- युवा चेहरा म्हणून इंदापूरच्या राजकारणात नवलौखिक.
- अल्पावधीत युवकांचे मोठा संघटन.
- होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून दावेदार.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी अनेक प्रभावी चेहरे...
प्रवीण माने,दीपक जाधव, बाळासाहेब काळे, कालिदास देवकर, डी एन जगताप, पै. हिराचंद उर्फ पिंटू काळे, हनुमंत जाधव, भूषण काळे, महारुद्र पाटील,मेघराज पाटील, संग्रामसिंह देशमुख, ज्ञानेश्वर बनकर,सागर बनकर, प्रशांत सूर्यवंशी, दादा वीर, नारायण वीर यांसह इतर ही अनेक प्रभावी चेहरे पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटात आहेत.
सध्या केवळ जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गणाची रचना जाहीर झाली आहे. यानंतर हा जिल्हा परिषद गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो यावरती उमेदवार ठरणार आहेत. त्यामुळे राजकारणातील प्रमुख पक्ष कोणते उमेदवार देतात आणि कोण कोणाच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो ते पाहण महत्त्वाच असेल.
पळसदेव बिजवडी गटात या गावांचा समावेश...
पळसदेव गण : डाळज नं. १, डाळज नं.२, डाळज नं. ३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी
बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाडी, वरखुटे बु., करेवाडी, लोणी देवकर,बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव, पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २, कालठण
What's Your Reaction?