लाखेवाडी काटी जिल्हा परिषद गटात तुमच्या पसंतीचा चेहरा कोण ? लिंक उघडा आणि तुमचं मत नोंदवा...

Oct 27, 2025 - 11:49
Oct 28, 2025 - 05:55
 0  6100

1. लाखेवाडी काटी जिल्हा परिषद गटात तुमच्या पसंतीचा चेहरा कोण ?

लाखेवाडी काटी जिल्हा परिषद गटात तुमच्या पसंतीचा चेहरा कोण ?
श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
विलासराव वाघमोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
नितीन शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अतुल झगडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अमोल मुळे,भारतीय जनता पार्टी
यापैकी कोणीही नाही
Total Votes: 3350

आय मिरर 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला महणून ओळख असलेल्या बावडा लाखेवाडी गटाची मोडतोड होऊन त्या गटाचा काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गट निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षातून अनेक चेहरे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे नेमका प्रबळ उमेदवार कोण याची चर्चाही आता पारा पारावर सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण आल्याने व काटी पंचायत समिती गणात सर्वसाधारण तर लाखेवाडीत पंचायत समिती गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण जाहीर झाले असल्याने येथे उमेदवारी देताना आणि त्यांना विजयी करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

या गटात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निकटवर्तीयांच्यातच सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या गटात आहे. पाटील आणि भरणे नेमके कोणत्या नेत्यास उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गणांसाठी भाजपाचे प्रवीण माने देखील या गटात भाजपाचे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखवून देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे काटी लाखेवाडी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी देखील आपला तगडा उमेदवार देऊ शकते.

असं आहे राजकीय समीकरण...

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत सुरुवातीच्या काळापासून खंबीरपणे असणारे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सभापती, निरा भीमा साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाममोडे, इंदापूर तालुका माळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, निरा भीमा कारखान्याचे संचालक अॅड. कृष्णाजी यादव, निरा भीमा कारखान्याचे संचालक राजकुमार जाधव, मोटार वाहतूक संघाचे संचालक तानाजी नाईक यांच्यासह अनेक जण या गटात येतात तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, त्यांच्या पत्नी लाखेवाडी गावच्या सरपंच चित्रलेखा ढोले हे यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे ते आता अजित पवार गटात आहेत. तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती स्वाती बापूराव शेंडे, वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे हे देखील हर्षवर्धन पाटील यांच्या बरोचर होते तेही आता राष्ट्रवादीत भरणे गटात आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष व झगडेवाडी गावचे सरपंच अतुल झगडे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब करगळ,हेमंत वाघमोडे, सोमनाथ मोहिते, संजय कांबळे, भाजपाचे अमोल मुळे यांचा ही या गटात समावेश आहे. 

प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सामना रंगणार असून निरा नदीकाठच्या गावांचे या गटात प्राबल्य दिसत आहे. नेते मंडळींनी जर याच भागातील कार्यकर्त्याला संधी दिली तर त्याचा फायदा पक्षांना होणार का हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या गटात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांचे शेटफळ हवेली हे गाव या गटात असल्याने ते देखील रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow